वडगाव - घेनंद येथील उपकेंद्राला वैद्यकीय साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:14 AM2021-08-12T04:14:50+5:302021-08-12T04:14:50+5:30
नागिरकांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी शैक्षणिक संस्थेकडून गुगलवर फॉर्म शेअर करण्यात आला होता. तो फॉर्म वडगाव - घेनंदच्या वतीने ग्रामपंचायत सदस्या ...
नागिरकांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी शैक्षणिक संस्थेकडून गुगलवर फॉर्म शेअर करण्यात आला होता. तो फॉर्म वडगाव - घेनंदच्या वतीने ग्रामपंचायत सदस्या योगिता शाम बवले यांनी भरल्यानंतर, शैक्षणिक संस्थेने सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून दिले.
या पार्श्वभूमीवर संस्थेकडून प्राप्त झालेले वैद्यकीय साहित्य वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, ग्रामपंचायत सदस्या योगिता बवले, ग्रामपंचायत सदस्य अमोल नितनवरे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन घेनंद आदींच्या हस्ते वडगावच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडे सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी आरोग्य सहायक जयराम रावते, एम. एस. चव्हाण, डी. आर. आढाव, आशा वर्कर शीतल तांजणे, कावेरी नितनवरे, जया आवटे, ॲड. शाम बवले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक :१० वडगाव-घेनंड उपक्रेंद्राला साहित्य
फोटो ओळ : वडगाव - घेनंद (ता. खेड) येथील उपकेंद्राला वैद्यकीय साहित्य सुपूर्द करताना फाउंडेशनचे पदाधिकारी.
100821\10pun_2_10082021_6.jpg
फोटो क्रमांक :१० वडगाव-घेनंड उपक्रेंद्राला साहित्य फोटो ओळ : वडगाव - घेनंद (ता. खेड) येथील उपकेंद्राला वैद्यकीय साहित्य सुपूर्द करताना फाउंडेशनचे पदाधिकारी