शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळेना वैद्यकीय अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:31 AM2019-02-18T00:31:04+5:302019-02-18T00:31:17+5:30
शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी कोट्यवधीचा निधी खर्च करुन ती २०१६ मध्ये पूर्ण करण्यात आली. मात्र तीन वर्षांपासून या सुसज्ज इमारतीत वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नाहीत.
निमसाखर : शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी कोट्यवधीचा निधी खर्च करुन ती २०१६ मध्ये पूर्ण करण्यात आली. मात्र तीन वर्षांपासून या सुसज्ज इमारतीत वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नाहीत. त्यामुळे ही कोट्यवधीची इमारत बांधल्यापासूनच धूळ खात पडून आहे. शेळगाव (ता. इंदापूर) येथील कोट्यावधीचा शासनाचा निधी खर्च करून सन २०१६ अखेर बांधकाम पूर्ण झालेले प्राथमिक आरोग्य केंद्रास जवळपास तीन वर्षे पूर्ण होऊनदेखील अद्यापही वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी मिळाले नाहीत. शेळगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या धूळ खात पडलेले आहे.
सन २०१२-२०१३ या बृहत आराखड्यानुसार दि. ११/०७/२०१४ रोजी इंदापूर तालुक्यातील शेळगावच्या नवीन आरोग्य केंद्रास प्रशासकीय मान्यता मिळून सदरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध झालेल्या कोट्यावधीच्या निधीतून इंदापूर तालुक्यात सर्वात मोठे प्रशस्त व सुसज्ज असी प्राथमिक आरोग्य केंद्राची शेळगाव येथे उभारणी करण्यात आली. मात्र केवळ पद भरती नाही म्हणून मागील दोन वर्षांपासून हे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद अवस्थेत आहे. परंतु शेळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेवक,कर्मचारी सह एकूण १५ पद भरतीसाठी
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवार १६ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजुरी दिली असून पद मंजुरी होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण होत आली आहे. तरी देखील शेळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्याप एकही वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर, कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत.म्हणून तीन वषार्पासून शेळगावचे आरोग्य केंद्र धुळखात पडलेले आहे. यामुळे शेळगाव, कडबनवाडी, गोतोंडी,शिरसट्वाडी हगारेवाडी, व्याहाळीसह इतर भागातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उपचारासाठी इतरत्र जावे लागत असल्यानें नागरिकांची महिलाची मोठी हेळसांड होताना दिसून येत आहे. म्हणून आरोग्य विभागाने शेळगावच्या आरोग्य केंद्रास डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची लवकरात लवकर नेमणूक करून आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
डिसेंबर २०१७ अखेर शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्याही परिस्थिती जिल्ह्णातील इतरत्र ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना याठिकाणी नेमणूक करून शेळगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी एका वषार्पूर्वी दिली होती. मात्र जवळपास एक वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा एकही वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर याठिकाणी रुजू झालेली नाहीत. यामुळे आरोग्य सभापती व आरोग्य विभागाचा जिल्ह्णातील वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर पकड नाही का असा सवाल शेळगावकरानी उपस्थित केला आहे.