वैद्यकीय अधिकारी न दिसणाऱ्या शत्रूंबरोबर लढतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:12 AM2021-04-09T04:12:38+5:302021-04-09T04:12:38+5:30
पुणे: डॉक्टर, परिचारिका न दिसणाऱ्या शत्रूपासून, तर सैनिक दिसणाऱ्या शत्रूपासून नागरिकांचा बचाव करतात, असे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण ...
पुणे: डॉक्टर, परिचारिका न दिसणाऱ्या शत्रूपासून, तर सैनिक दिसणाऱ्या शत्रूपासून नागरिकांचा बचाव करतात, असे मत एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टीच्या स्थापन दिनानिमित्त पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष सुनील पांडे (लोहगांवकर) यांच्यावतीने कोरोना योद्ध्यांचा गोखले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कमला नेहरू पार्क, प्रभात रोड येथील महाराष्ट्र मेडिकल फाऊंडेशनच्या जोशी हॉस्पिटल मधील लसीकरण करणाऱ्या २० डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आले. भाजपाचे शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर तसेच गणेश बगाडे, विनायक नवयुग मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय फंड, हॉस्पिटलचे सीईओ डॉ. चंद्रशेखर कर्वे, डॉ. विजय अग्रवाल, भाजपाचे समीर हळदे, श्रीधर खांडेकर, ऋषिकेश आर्य यावेळी उपस्थित होते.
रवींद्र साळेगावकर, डॉ. चंद्रशेखर कर्वे यांचीही यावेळी भाषणे झाली.