पुणे रेल्वे स्थानकावर मेडिकल स्टोअर, प्रवाशांना कमी किमतीत मिळणार औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:40+5:302021-05-31T04:08:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना कमी किमतीत औषधे मिळतील. कारण आयआरएसडीसी (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना कमी किमतीत औषधे मिळतील. कारण आयआरएसडीसी (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) देशातील केवळ पाच रेल्वे स्थानकावर मेडिकल स्टोअर सुरू करीत आहे. यात पुणे स्थानकाचा देखील समावेश आहे. पुणे स्थानकाच्या आरक्षण केंद्राजवळची जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे.
आयआरएसडीसी पुणे, सिकंदराबाद, बंगळुरू, आनंद विहार व चंदीगड या पाच स्थानकांवर मेडिकल स्टोअरची सेवा देणार आहे. त्यापैकी सिकंदराबाद स्थानकावर ही सेवा नुकतीच सुरू झाली आहे. पुणे स्थानकावर सुरू होणारे स्टोअर हे जेनेरिक असेल, त्यामुळे प्रवाशांना कमी किमतीत औषधे उपलब्ध होतील. दवा दोस्त फार्मा कंपनीकडे या मेडिकलची जबाबदारी असेल. प्रवाशांसह बाहेरील नागरिक देखील येथे येऊन औषधे घेऊ शकतील. लवकरच याची सुरुवात होईल.