सर्पदंशानंतर औषधोपचार महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:11 AM2021-09-27T04:11:57+5:302021-09-27T04:11:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : सर्पदंश झाल्यावर घाबरून जाऊ नये. घाबरल्यामुळे शरीरात वेगाने विष पसरते. सर्पदंश झाल्यावर तोंडाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर : सर्पदंश झाल्यावर घाबरून जाऊ नये. घाबरल्यामुळे शरीरात वेगाने विष पसरते. सर्पदंश झाल्यावर तोंडाने विष काढण्याचा प्रयत्न करू नये. सर्पदंश नेहमी माणसाच्या हातावर किंवा पायावर होतो. ज्या ठिकाणी साप चावला असेल त्याच्या काही वर फडक्याने घट्ट बांधावे व लवकरात लवकर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे. विषारी साप चावल्यानंतर विष पसरायला कमीत कमी तीन तास लागतात. त्यामुळे लवकर औषध उपचार महत्त्वाचा आहे, असे सर्पमित्र शरद मुंड यांनी माहिती देत प्रबोधन केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग व वर्ल्ड फॉर नेचर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर येथे सर्पदंश कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कलामधील विद्यार्थिनी पूजा मोहिते हिचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. तिला श्रद्धांजली वाहण्यात आली.
सर्पदंशाचे ६० टक्के प्रमाण खेड्यामध्ये आहे. भारतामध्ये एकूण ५५० प्रकारचे साप आढळतात. त्यातील १५ साप हे विषारी आहेत, तर नाग, घोणस, फुरसे व मण्यार हे अतिविषारी आहेत. हे चावल्यावर माणसाचा मृत्यू होतो. सापांबाबत साप दूध पितो, साप डुक धरतो, इच्छाधारी नाग-नागीण असे अनेक प्रकारचे गैरसमज चित्रपटांमुळे निर्माण झाले आहेत. त्यापासून सावध राहून सत्य जाणून घेण्याचे आवाहन डॉ. शेवते यांनी प्रास्ताविकात केले.
वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे शुभम पांडे यांनी सर्पदंशाबाबत समाजात अजूनही खूप अंधश्रद्धा आहेत. अंगारा लावणे, मंत्र उच्चारणे, साप चावल्यानंतर पत्नीचे तोंड न पाहणे, गरोदर महिलेने सापाचे तोंड न पाहणे आदीबाबत जनजागृती करण्याचे व वैज्ञानिक बाजू मांडण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी वर्ल्ड फॉर नेचरचे शंतनू जगताप, भारत चौधरी, सर्पमित्र विशाल शिंदे, स्वप्निल शिंदे, सनी कडके, सोनू खेडकर, डॉ. सचिन घाडगे आणि महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन साक्षी सणस हिने केले, तर आभार ओंकार फणसे याने मांडले.
सोबत फोटो व ओळ : नसरापूर (ता. भोर) येथील शंकरराव भेलके महाविद्यालयात सर्पदंश कार्यशाळेचे आयोजन केले होते.
260921\img-20210926-wa0016__01.jpg
???? ???? ? ?? : ??????? (??. ???) ????? ??????? ????? ????????????? ??????? ??????????? ????? ???? ???? .