वरवंडच्या सरपंचपदी मीना दिवेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:12 AM2021-02-10T04:12:04+5:302021-02-10T04:12:04+5:30
निवडणूक प्रकियेला सकाळी सुरुवात झाली. यामध्ये सकाळी ११ ते १२ दरम्यान अर्ज भरणे, १ ते १.३० दरम्यान माघार ...
निवडणूक प्रकियेला सकाळी सुरुवात झाली. यामध्ये सकाळी ११ ते १२ दरम्यान अर्ज भरणे, १ ते १.३० दरम्यान माघार घेण्याची वेळ होती. सरपंच पदासाठी मीना रामदास दिवेकर व योगिनी विजय दिवेकर यांनी अर्ज दाखल केला होते. यामध्ये योगिनी दिवेकर यांनी अर्ज मागे घेतल्याने सरपंच पदासाठी मीना दिवेकर यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पादासाठी प्रदीप किसन दिवेकर, बाळासाहेब गंगाधर जगताप, तानाजी संभाजी दिवेकर या तिघांनी अर्ज भरले होते. यापैकी बाळासाहेब जगताप व तानाजी दिवेकर यांनी त्यांचा अर्ज माघारी घेतल्यामुळे प्रदीप दिवेकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश गायकवाड यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक एस. बी.डोळस, गोरख दिवेकर, राहुल दिवेकर, बंडू सातपुते, अशोक फरगडे, मारुती फरगडे, दत्तात्रेय दिवेकर, शाफिक शेख, प्रज्ञा दिवेकर, मंदाकीनी खोमणे, विलास दिवेकर, रवींद्र दिवेकर, अर्चना रणधीर, उपस्थित होते.