वाइल्ड संघटनेतर्फे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:27+5:302020-12-27T04:08:27+5:30
पुणे : शहरात गवा आल्याने आता त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हायला हवी, यासाठी वाइल्ड संघटनेतर्फे रविवारी नागरिकांसाठी बैठक आयोजिली आहे. ...
पुणे : शहरात गवा आल्याने आता त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हायला हवी, यासाठी वाइल्ड संघटनेतर्फे रविवारी नागरिकांसाठी बैठक आयोजिली आहे. ही बैठक राजेंद्रनगर, दत्तवाडीतील सचिन तेंडुलकर उद्यानात सायंकाळी ४ ते ५ या वेळेत होईल. यामध्ये वन्यजीव शहरात आल्यावर काय करायला हवे, याची माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. ज्यांना या विषयी आवड असेल, त्यांनी जरूर यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदात्यांना तुळशीचे रोप
पुणे : श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, निसर्गराजा मित्रजीवांचे आणि श्री शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने रविवारी निगडीत रक्तदान शिबिर झाले. या वेळी ११६ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना तुळशीचे रोपे भेट म्हणून देण्यात आली.