राजकारणातली मोठी घडामोड; केंद्रिय मंत्री अमित शाह अन् हर्षवर्धन पाटील यांच्यात दिल्ली दरबारी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 08:52 PM2021-08-11T20:52:36+5:302021-08-11T20:53:51+5:30

हर्षवर्धन पाटलांचा महिन्याभरात दोनदा दिल्ली दौरा; मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

Meeting between Union Minister Amit Shah and Harshvardhan Patil in the Delhi | राजकारणातली मोठी घडामोड; केंद्रिय मंत्री अमित शाह अन् हर्षवर्धन पाटील यांच्यात दिल्ली दरबारी भेट

राजकारणातली मोठी घडामोड; केंद्रिय मंत्री अमित शाह अन् हर्षवर्धन पाटील यांच्यात दिल्ली दरबारी भेट

Next

कळस: माजी सहकारमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली. पाटील यांचा महिन्यातच दोन वेळा दिल्ली दौरा झाल्याने मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .यामुळे इंदापुर तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे

हर्षवर्धन पाटील यांनी दिल्ली दरबारी वजन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे .त्यातून पाटील यांच्या दिल्ली वाºया वाढल्याचे संकेत आहेत. केंद्रिय मंत्री अमित शाह यांना मंत्रिमंडळ विस्तारात सहकार खाते निर्माण करून देण्यात आले आहे. या खात्याचे अभ्यासक व सहकार खात्याचे मंत्री म्हणून राज्यात पाटील यांनी दिर्घ काळ जबाबदारी संभाळली आहे. या पार्श्वभुमीवर पाटील यांनी केंद्रीय मंत्री शाह यांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. याशिवाय पाटील यांनी  सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केल्याचे सुत्रांनी सांगितले. पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करुन पश्चिम महाराष्ट्रात  भाजप आपली  ताकद मजबूत करण्याची शक्यता आहे. पाटील यांच्या समवेत आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे होते. सहकार चळवळीशी या दोन्ही पाटील कुटुंबाचा जवळचा संबंध आहे 
सुमारे २० वर्षे मंत्री राहिलेल्या पाटील यांचा सलग दोन वेळा पराभव झाला.काँग्रेस पक्षाच्या विचारधारा बाळगून पाटील यांनी २५ वर्षे तालुक्याचे व राज्याच्या राजकारणात आपला प्रभाव निर्माण केला .मात्र ,आघाडीच्या राजकारणात रास्ट्रवादी काँग्रेसशी न जमल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला .मात्र नव्याने भाजपवाशी झालेल्या पाटलांना भाजपकडून फारशी ताकद मिळाली नाही .त्यामुळे पाटील स्वगृही परतणार अशीही चर्चा होऊ लागली .मात्र गेली महिनाभरात पाटील यांनी दोन वेळा दिल्ली दौरा करुन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.तसेच भाजपाचे वजनदार नेते अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

कायद्याची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षित पाटील यांचे मराठी, हिंदी व इंग्रजी उत्तम  आहे .त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही मिळाला होता.पाटील यांना सहकार खात्याचा अनुभव असल्याने त्यांना पक्षश्रेष्ठींनी मोठे आश्वासन दिले असल्याची तालुक्यात चर्चा आहे ..

Web Title: Meeting between Union Minister Amit Shah and Harshvardhan Patil in the Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.