भाजपच्या समर्थ बूथ अभियानाची ओतूरमध्ये बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:15 AM2021-08-14T04:15:32+5:302021-08-14T04:15:32+5:30
येत्या काळात भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुक्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असून, यासाठी कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर संघटनात्मक बांधणीवर जोर ...
येत्या काळात भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुक्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार असून, यासाठी कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर संघटनात्मक बांधणीवर जोर द्यावा, असे खांडरे यांनी सांगितले. या वेळी प्रदेश पदाधिकारी बबनराव उकिर्डे, जिल्हा उपाध्यक्ष भगवान घोलप, जिल्हा सचिव रोहिदास भोंडवे, अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर काठे, ज्येष्ठ नेते हरीश भवाळकर, उल्हास नवले, मुक्ता दाते, सचिन शिंदे, अविनाशजी मोरडे, सुनंदाताई गाडगे, तालुका सरचिटणीस मयूर तुळे, संपर्कप्रमुख नवनाथ हांडे, उपाध्यक्ष रमेश वायकर, दत्तात्रय डुंबरे, प्रवक्ते रोहिदास कोल्हाळ, महिला मोर्चाच्या संजीवनी हांडे, कलावती मोढवे, सुमैया शेख, सुजाता शिंदे, कल्पेश गाडगे, अतुल वायकर, योगेश उकिर्डे, अरुण केदार उपस्थित होते.
या वेळी बापू हांडे यांची तालुका संघटकपदी, सौरभ नलावडे यांची तालुका सचिवपदी, सुजाता शिंदे यांची युवती आघाडी प्रमुखपदी, विनोद तापासे यांची अनुसूचित जाती तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
--
फोटो क्रमांक: १३ ओतूर भाजप बूथ अभियान
फोटो -नियुक्तीपत्र देताना भाजपा तालुकाध्यक्ष संतोष तांबे.
130821\13pun_7_13082021_6.jpg
फोटो -नियुक्ती पत्र देतांना भा.ज.पा तालुका अध्यक्ष संतोष तांबे