कोरोनाच्या प्रतिबंधासाठी धनकवडीत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:11 AM2021-02-25T04:11:40+5:302021-02-25T04:11:40+5:30
उल्लेखनीय बाब म्हणजे दक्षिण पुण्यातील हे एकमेव कोरोना चाचणी केंद्र असून मागील ९ महिन्यांपासून ते सुरू आहे. मधल्या काळात ...
उल्लेखनीय बाब म्हणजे दक्षिण पुण्यातील हे एकमेव कोरोना चाचणी केंद्र असून मागील ९ महिन्यांपासून ते सुरू आहे. मधल्या काळात कोरोनाचा संसर्ग मंदावला असतानाही हे केंद्र अव्याहतपणे सुरू होते. या केंद्रात आत्तापर्यंत कोरोनाच्या २९,००० चाचण्या झाल्या आहेत.
चौकट - कोरोना चाचण्या वाढवणे गरजेचे : नगरसेवक विशाल तांबे.
या केंद्रातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणे गरजेचे असून त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. मागील काळात दररोज ३०० ते ४०० चाचण्या होत असत. सध्या फक्त २०० ते २५० चाचण्या होतात. सध्या ७० कर्मचाऱ्यांऐवजी ३५ कर्मचाऱ्यांवर काम सुरू आहे, त्यामुळे आरोग्यसेवकांवर कामाचा ताण वाढला आहे. तसेच नागरिकांनाही चाचणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. हे केंद्र मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या ठिकाणचे नियोजित कोरोना लसीकरण केंद्र लवकर सुरू होणे गरजेचे आहे. याबाबत आयुक्तांशी पत्रव्यवहार व सकारात्मक चर्चा झाली आहे.