चाकणमधील व्यापाऱ्यांच्या अँटिजेन चाचणी केंद्र जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:10 AM2021-04-02T04:10:52+5:302021-04-02T04:10:52+5:30
याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका ...
याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी गाढवे, चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चाकण शहरात वाढत्या कोरोनाच्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नगरपरिषद आणि ग्रामीण रुग्णालय चाकण यांच्या माध्यमातून शहरातील महात्मा फुले मार्केट यार्डमधील व्यापारी, आडते, हमाल, भाजीपाला बाजारातील व्यापारी, बाजार पेठेतील व्यापारी, किरकोळ व्यावसायिक आदींची अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. या कॅम्पला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. चाकण शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी स्वतःची अँटिजेन चाचणी करून पालिकेला सहकार्य करावे आणि स्वतःसह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.
दरम्यान, मागील १२ दिवसांत १ हजार ३०० व्यावसायिकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये १४० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
नानासाहेब कामठे, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद.
०१ चाकण
चाकण शहरातील अँटिजेन चाचणी केंद्राची पाहणी करताना जिल्हाधिकारी.