‘महाराष्ट्र चेंबर’ची दिल्लीत बैठक
By admin | Published: March 26, 2017 01:52 AM2017-03-26T01:52:51+5:302017-03-26T01:52:51+5:30
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर, मुंबई या उद्योग व व्यापार क्षेत्रातील राज्यातील शिखर
पिंपरी : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर, मुंबई या उद्योग व व्यापार क्षेत्रातील राज्यातील शिखर संस्थेच्या प्रबंध समितीच्या दिल्ली येथील जैन कॉन्फरन्सच्या जैन भवनमध्ये झालेल्या बैठकीस ८५ उद्योजक उपस्थित होते.
जैन कॉन्फरन्सचे महामंत्री डॉ. अशोक पगारिया यांनी चेंबरचे अध्यक्ष शंतनु भडकमकर यांचा आणि कोषाध्यक्ष महेंद्र बोकरिया यांनी चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेच्या यांचा सन्मान केला. उपस्थित सभासदांचे स्वागत करण्यात आले.
प्रा. पगारिया यांनी जैन कॉन्फरन्सच्या कार्याची माहिती दिली. भडकमकर यांनी, उद्योग-व्यवसायासंदर्भातील चेंबरच्या उपक्रमांची माहिती दिली. मंचावर चेंबरचे उपाध्यक्ष अनिल लोढा, अमित कामत, ललित गांधी, समीर दूधगावकर व माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या निवासस्थानाच्या हिरवळीवर चेंबरचे स्नेहसंमेलन पार पडले. ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार किरीट सोमय्या, अमर साबळे,
अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, श्रीरंग बारणे, पूनम महाजन, रक्षा खडसे आणि राजकीय व प्रशासकीय क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.(वा. प्र.)