पुण्याच्या पाण्यावर महापाैरांची जलसंपदा अधिकाऱ्यांसाेबत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 03:30 PM2019-01-17T15:30:27+5:302019-01-17T15:32:22+5:30

महापाैर, पालिका अधिकारी आणि जलसंपदा अधिकाऱ्यांमध्ये बंद दाराआड बैठक सुरु झाली आहे. या बैठकीतून काय निर्णय हाेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

meeting of mayor with irrigation officers | पुण्याच्या पाण्यावर महापाैरांची जलसंपदा अधिकाऱ्यांसाेबत बैठक

पुण्याच्या पाण्यावर महापाैरांची जलसंपदा अधिकाऱ्यांसाेबत बैठक

Next

पुणे : जलसंपदा विभागाकडून बुधवारी दुपारी काेणतीही पूर्वसुचना न देता, अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला हाेता. त्यामुळे याचे तीव्र पडसाद उपटले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील ऐकत नसतील तर त्या मुजाेर अधिकाऱ्यांना मुक्ता टिळक या जाब विचारण्यासाठी आज सिंचनभवन येथे त्यांनी भेट घेणार हाेत्या. तसेच पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना शहरामध्ये फिरकू देणार नाही, असा इशाराही टिळक यांनी दिला हाेता. सध्या महापाैर, पालिका अधिकारी आणि जलसंपदा अधिकाऱ्यांमध्ये बंद दाराआड बैठक सुरु झाली आहे. या बैठकीतून काय निर्णय हाेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
 
महापालिका कालवा समिती व जलसंपदा नियमन प्राधिकरणाच्या निर्णयाचा दाखला देत जलसंपदा विभागाने गेल्या काही दिवसांत तीन वेळा अचानक शहराचा पाणी पुरवठा बंद केला आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, शहरात पाणी कपात करण्यात येऊ नये अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपच्या सर्व पदाधिका-यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. पुणे दौ-यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करू नये असे थेट आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले होते. त्यानंतर देखील पुण्यातील जलसंपदा विभागाचा मनमानी कारभार सुरुच असून, बुधवारी (दि.१६)  दुपारी पर्वती पंपिंग स्टेशनचा पाणी पुरवठा अचानक बंद केला. यामुळे महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी प्रचंड संतप्त झाले. महापौर मुक्ता टिळक यांनी याप्रकरणी जलसंपदा मंत्री यांच्याशी संपर्क साधून पाणी पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी केली आहे. 

Web Title: meeting of mayor with irrigation officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.