भयमुक्त एमआयडीसीसाठी कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:12+5:302020-12-27T04:08:12+5:30
बैठकीला फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे पदाधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी, म्हाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ ...
बैठकीला फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे पदाधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी, म्हाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस, चाकण वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक डावरे, महाळुंगे पोलीस चौकीचे अधिकारी व अंमलदार असे यावेळी उपस्थित होते.
बैठकीमध्ये कंपनीचे प्रतिनिधी यांनी कंपन्यांमधील होणाऱ्या चोऱ्या, कामगार संघटना, युनियन यांच्या अडचणी, वाहतूक समस्या आदी समस्या मांडल्या. त्यावर चर्चा करून, कंपनी परिसरात व बाहेरील रस्ता दिसेल असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, कामगारांचे पगार त्यांचे खात्यावर जमा करणे जेणेकरून चोर्यांचे प्रमाण कमी होईल, महिला कामगारांच्या बाबतीत योग्य ती काळजी घेणे, रात्रीचे वेळी जास्तीत जास्त सुरक्षारक्षक नेमणे, कॉन्ट्रॅक्ट, माथाडी, लेबर कॉन्ट्रॅक्ट, स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्टवरून स्थानिक लोकांचे दबावाला न जुमानता पोलीस ठाण्याला तात्काळ कळवावे
यावेळी परीमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर व महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्याकडून कंपनींच्या प्रतिनिधिंना पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश यांच्या भयमुक्त एम आय डी सी या संकल्पनेतून कुठल्याही प्रकारच्या दबावाला न जुमानता तात्काळ पोलीस ठाण्याला संपर्क करण्याचे आहवान करण्यात आले.
--२६महाळुंगे एमआयडीसी मिटींग
फोटो ओळी : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्तांच्या भयमुक्त एमआयडीसी संकल्पनेनुसार घेण्यात आलेल्या बैठीकत औद्योगिक नगरीतील कंपन्यांचे प्रतिनिधी