संमेलनस्थळ बडोदा, अमरावती की शिरूर? ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, श्याम मानव यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर उद्भवला वाद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 03:38 AM2017-09-16T03:38:27+5:302017-09-16T03:38:36+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील शुकदासमहाराज यांच्या विवेकानंद आश्रमाने संमेलनाचा प्रस्ताव मागे घेतल्यानंतर, महामंडळ आता ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कोणत्या स्थळाचा विचार करणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Meeting venue Baroda, Shirur of Amravati? 9 1 All India Marathi Sahitya Sammelan, Shyam Manav, after the objections were filed | संमेलनस्थळ बडोदा, अमरावती की शिरूर? ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, श्याम मानव यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर उद्भवला वाद  

संमेलनस्थळ बडोदा, अमरावती की शिरूर? ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, श्याम मानव यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर उद्भवला वाद  

Next

पुणे : बुलडाणा जिल्ह्यातील शुकदासमहाराज यांच्या विवेकानंद आश्रमाने संमेलनाचा प्रस्ताव मागे घेतल्यानंतर, महामंडळ आता ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कोणत्या स्थळाचा विचार करणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने साहित्य महामंडळाकडे नव्याने प्रस्ताव पाठवून संमेलन घेण्याची तयारी दाखवल्याने, आगामी संमेलन बडोद्याला होणार की शिरूरला किंवा अमरावतीची निवड होणार का? या चर्चांना वेग आला आहे.
आगामी साहित्य संमेलनासाठी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अमरावती, बडोद्यातील मराठी वाङ्ममय परिषद, नागपूरच्या कल्याण शिक्षण संस्थेकडून चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी, बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रम, तसेच दिल्ली मराठी प्रतिष्ठान अशा सहा ठिकाणांहून महामंडळाकडे प्रस्ताव आले होते. त्यातील तीन शहरांचा विचार करून समितीने १९ आणि २० आॅगस्टला दिल्ली आणि बडोदा तर ९ सप्टेंबरला हिवरा येथील आश्रमाची पाहणी केली. दिल्ली मराठी प्रतिष्ठानने असमर्थता दर्शवल्यानंतर बडोदा आणि हिवरा यापैैकी हिवरा आश्रमाला समितीच्या सदस्यांनी पसंती देऊन तेथे साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी संमेलनस्थळाला आक्षेप नोंदवल्यानंतर मोठ्या प्रमाणात वादाला तोंड फुटले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटिक असावे, असे अनेकांना वाटत असल्याची टिपण्णी करत पाठविलेला प्रस्ताव मागे घेत असल्याचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

महामंडळाकडे नव्याने प्रस्ताव पाठवला
महामंडळाच्या स्थळ निवड समितीने शिरूर आणि अमरावतीला भेट देऊन पाहणी केली नव्हती. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने महामंडळाकडे नव्याने प्रस्ताव पाठवला आहे. प्रतिष्ठानने आगामी संमेलनाच्या यजमानपदाची तयारी दर्शवली असून, महामंडळाने या प्रस्तावाचा विचार करावा, असे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आगामी संमेलन बडोद्याला होणार की अमरावती अथवा शिरूरची निवड होणार, याबाबत चर्चांना वेग आला आहे.

बुलडाण्यातून दुसरा प्रस्ताव
बुलडाण्यातच दुसºया ठिकाणी संमेलन व्हावे, यासाठी बुलडाण्याची विदर्भ साहित्य महामंडळाची शाखा प्रस्ताव पाठविणार आहे. बडोद्याचे नाव कायम आहेच; त्याशिवाय शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अमरावती, येथे संमेलन घ्यावे, असा प्रस्ताव परत नव्याने साहित्य महामंडळाकडे पाठविला आहे.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार, अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार सर्वस्वी महामंडळाच्या अध्यक्षांकडे सुपूर्त करण्यात आले आहेत.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप

कोणत्या पर्यायांचा विचार करायचा हे ठरवू
हिवरा येथील विवेकानंद आश्रमाने संमेलनाचा प्रस्ताव मागे घेतला आहे. त्यानंतर शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे महामंडळाकडे नव्याने प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. संमेलनस्थळाचा अधिकार एकट्या अध्यक्षांकडे नसतो. त्यामुळे सर्व पदाधिकारी आणि घटक संस्थांशी चर्चा करून संमेलनस्थळासाठी कोणत्या पर्यायांचा विचार करायचा, हे ठरवले जाईल.
- श्रीपाद जोशी, अध्यक्ष,
अखिल भारतीय साहित्य महामंडळ

हिवरा आश्रम येथे काही कारणास्तव संमेलन होऊ शकले नाही; मात्र आम्ही जहाज सोडले नसून, जर महामंडळाने पुन्हा प्रस्ताव मागितला, तर बुलडाणा येथे संमेलन घेण्यासाठी प्रस्ताव पाठविणार आहोत. संमेलन बुलडाणा येथे यशस्वीपणे घेऊन दाखवू.
- नरेंद्र लांजेवार,
साहित्यिक बुलडाणा

दशकभरात दुसºयांदा संमेलनातून आयोजक संस्थेची माघार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार, असे सूचित होताच त्यासंबंधातील वादांनाही तोंड फुटते आणि संमेलन संपेपर्यंत अनेक प्रकारचे वाद सुरूच राहतात.
९१ व्या साहित्य संमेलनालाही सुरुवातीपासूनच वादाने घेरल्यामुळे संमेलन आणि वाद ही परंपरा कायम राहिली आहे. महामंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर आयोजक संस्थेने संमेलनस्थळाचा प्रस्ताव मागे घेण्याची ही गेल्या दहा वर्षांतील दुसरी वेळ आहे. २०१२ मध्ये बडोदा वाङ्मय मंडळाने संमेलन आयोजित करण्याबाबत असमर्थता दर्शवली होती.
महामंडळाने बुलडाणा जिल्ह्यातील विवेकानंद हिवरा आश्रमावर संमेलनासाठी शिक्कामोर्तब केल्यानंतर या निर्णयावर टिका होऊ लागली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी संमेलनस्थळाला विरोध केला. शुकदासमहाराजांच्या आश्रमावर झालेली टिकेनंतर हिवरा आश्रमाने संमेलनस्थळासाठी पाठवलेला प्रस्ताव मागे घेतला. यापूर्वीही २०१२ मध्ये निमंत्रकपदाचा मान मिळालेल्या संस्थेने आयोजनातून माघार घेतली होती.
१९८८ साली अखिल भारतीय साहित्य संमेलन प्रवरानगरला घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी बाळासाहेब विखे-पाटील यांनी ‘त्या’ संमेलनासाठी आनंद यादव हेच अध्यक्ष हवेत, अशी जाहीरपणे मागणी केली होती. मात्र, ही भूमिका आम्हाला मान्य नाही, असे सांगत साहित्य महामंडळाने संमेलनस्थळ बदलले होते. ते संमेलन ठाण्याला आयोजित करण्यात आले. वसंत कानिटकर त्यावेळी अध्यक्ष होते. त्यामुळे वाद हा संमेलनाचा अविभाज्य भाग बनल्याचे मत साहित्य वर्तुळातून आणि सामान्यांमधून व्यक्त होत आहे.

आर्थिक अडचणी व मनुष्यबळाचा अभाव
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कार्यालय मुंबई मराठी साहित्य संघाकडे असताना २०१२ मध्ये बडोदा वाङ्मय मंडळाला साहित्य संमेलनाच्या निमंत्रकपदाचा बहुमान मिळाला होता.
उषा तांबे या साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा होत्या. त्यावेळी ८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्याला होणार, हे निश्चित झाले होते.
बृहन्महाराष्ट्रात साहित्य संमेलनाचा झेंडा फडकावा, हा यामागचा उद्देश होता. मात्र, संमेलन स्थळ जाहीर झाल्यानंतर आर्थिक अडचण आणि मनुष्यबळाचा अभाव यामुळे बडोदा येथील संस्थेने संमेलन आयोजित करण्याबाबत असमर्थता दर्शवली होती.
बडोद्याने माघार घेतल्याने महामंडळाला संमेलनस्थळ बदलावे लागले होते. ८५ वे संमेलन महामंडळाने चंद्रपूर येथे आयोजित केले होते. ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी वसंत आबाजी डहाके हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.

Web Title: Meeting venue Baroda, Shirur of Amravati? 9 1 All India Marathi Sahitya Sammelan, Shyam Manav, after the objections were filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.