महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने महिला व बाल विकास मंत्र्यांसमवेत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:59+5:302021-01-14T04:10:59+5:30
मंत्री ठाकूरा यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कोविड काळातील व एकूणच कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून मासिक पेन्शन बाबत सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा ...
मंत्री ठाकूरा यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कोविड काळातील व एकूणच कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून मासिक पेन्शन बाबत सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा केली. शासकीय व प्रशासकीय पातळीवरील प्रक्रियेसाठी काही वेळ लागेल परंतु महाविकास आघाडी सरकार अंगणवाडी सेविकांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती पावले नक्की उचलेल अशी ग्वाही दिली. थकित सेवासमाप्ती लाभ देण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील प्रक्रिया पूर्ण होत आल्याचे त्यांनी सांगितले.
थकित देयकांबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचे त्यांनी मान्य केले.
मदतनिसांची सेविकापदी थेट नियुक्ती, मोबाईल व ऑनलाईन काम आदी अन्य प्रश्नांवर पुढील आठवड्यात विभाग पातळी वर सविस्तर बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बैठकीत कृती समितीच्या वतीने एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, नितीन पवार व सुवर्णा तळेकर सहभागी झाले होते. प्रशासनाच्या वतीने महिला व बालविकास विभागाचे सहसचिव जरांडे व एकात्मिक बालविकास सेवा योजना उपायुक्त श्रीमती नगरकर,श्री क्षीरसागर,विशेष अधिकारी श्रीमती योगिनी सुर्वे हे अधिकारी उपस्थित होते.