पुणे-मिरजदरम्यान मेगा ब्लॉक; तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शनमध्ये दुहेरीकरणाचे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 10:59 AM2024-02-17T10:59:09+5:302024-02-17T11:00:13+5:30
रेल्वे प्रशासनाने या काळात काही गाड्यांच्या वेळा बदलल्या असून, काही गाड्या रद्द केल्या आहेत...
पुणे : मध्य रेल्वेपुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वेमार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शनमध्ये दुहेरीकरण आणि विविध अभियांत्रिकी, सिग्नलिंग दूरसंचार कामांसाठी गुरुवार (दि. २२) पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या काळात काही गाड्यांच्या वेळा बदलल्या असून, काही गाड्या रद्द केल्या आहेत.
रद्द केलेल्या गाड्या :
दि. २० रोजी कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस
दि. २१ पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस
दि. २२ कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस
दि. २३ पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस
शॉर्ट टर्मिनेशन/शॉर्ट ओरिजिनेशन...
दि. २१ व २२ कोल्हापूर-सातारा डेमू कऱ्हाडपर्यंत धावेल.
दि. २१ व २२ सातारा-कोल्हापूर डेमू कऱ्हाड येथून धावेल.
दि. २१ व २२ रोजी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस साताऱ्यापर्यंत धावेल.
दि. २१ व २२ रोजी कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस सातारा-पुणे धावेल.
दि. २१ रोजी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यात थांबेल.
दि. २२ रोजी कोल्हापूर-गोंदिया पुणे येथून सुटेल.
- परिवर्तित मार्गावरून जाणाऱ्या गाड्या...
दि. २१ रोजी हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस दौंड-कुर्डूवाडी-पंढरपूर-मिरज मार्गाने धावेल.
दि. २१ रोजी बंगळुरू-जोधपूर एक्सप्रेस मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी-दौंड-पुणे या मार्गावर धावेल.
रेग्युलेट करण्यात येणाऱ्या गाड्या...
दि. १८ रोजी बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस एक तास पंचवीस मिनिटांसाठी रेग्युलेट केली जाईल.
दि. १९ रोजी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस सेक्शनमध्ये एक तासासाठी रेग्युलेट केली जाईल.
दि. १९ रोजी बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस सेक्शनमध्ये पावणेदोन तास रेग्युलेट केली जाईल.
दि. २० रोजी मिरज-पुणे तीस मिनिटांसाठी रेग्युलेट केली जाईल.
दि. २१ रोजी हजरत निजामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस दोन तास रेग्युलेट केली जाईल.