खासदार वंदना चव्हाण राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष

By admin | Published: May 14, 2016 12:36 AM2016-05-14T00:36:53+5:302016-05-14T00:36:53+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांना कायम करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी महापौर प्रशांत जगताप

Member of Parliament Vandana Chavan NCP City President | खासदार वंदना चव्हाण राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष

खासदार वंदना चव्हाण राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष

Next

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांना कायम करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी महापौर प्रशांत जगताप यांना या निवडीची घोषणा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिका निवडणुका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालीच लढविणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांपासून पक्षाच्या शहराध्यक्षपदाची धुरा चव्हाण यांच्याकडे आहे. मात्र, खासदार आणि शहराध्यक्ष ही दोन्ही पदे असल्याने वर्षभरापूर्वी चव्हाण यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी महापौर बदलानंतर तसेच भाजप आणि काँग्रेसकडून महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शहराध्यक्ष बदलल्यानंतर राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडूनही पालिका निवडणुकीसाठी शहराध्यक्ष बदलण्याची मागणी होत होती. त्यानुसार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली होती. शहराध्यक्ष निवडीचे सर्व अधिकार शरद पवार यांना देण्याचा निर्णय झाला होता. या पदासाठी राष्ट्रवादीकडून माजी आमदार अनिल भोसले, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी उपमहापौर दीपक मानकर, विद्यमान कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, अप्पा रेणुसे, सुभाष जगताप इच्छुक होते. पुण्यातील प्रलंबित प्रश्नाबाबत बैठकीला उपस्थित असलेल्या शरद पवार यांनी शहराध्यक्षपदी वंदना चव्हाण यांनाच कायम केले असल्याचे महापौर जगताप यांना सांगितले.

Web Title: Member of Parliament Vandana Chavan NCP City President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.