व्यवस्थापन परिषदेचे सदस्य स्वतंत्र संकुलास अनुकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:12 AM2020-12-31T04:12:26+5:302020-12-31T04:12:26+5:30

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषेच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संकुल असावे याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अनुकुल आहेत. ...

Members of the Management Council adapt to the independent package | व्यवस्थापन परिषदेचे सदस्य स्वतंत्र संकुलास अनुकुल

व्यवस्थापन परिषदेचे सदस्य स्वतंत्र संकुलास अनुकुल

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषेच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संकुल असावे याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अनुकुल आहेत. तसेच येत्या व्यस्थापन परिषदेच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठच्या स्थापनेच्या उद्देशाला ७० वर्षानंतर प्रारंभ होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे स्कूल ऑफ इंडियन लॅग्वेज आणि स्कूल ऑफ इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लॅग्वेज असे संकुल तयार केले आहेत. त्यात मात्र, मराठी विभागाचा समावेश स्कूल ऑफ इंडियन लॅग्वेज मध्ये न करू नये. तर मराठी विभागाला स्वतंत्र संकुलाचा दर्जा मिळावा, यासाठी अशी मागणी विविध विद्यार्थी संघटना व विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्यांकडून केली. त्यास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी सकारत्मकता दर्शविली आहे.

विद्यापीठाची स्थापना मराठी भाषेच्या अभ्यासासाठी आणि उत्कर्षासाठी केली. मात्र,कालांतराने निर्माण झालेल्या विद्याशाखांना आलेल्या महत्त्वामुळे मराठी भाषा विकासा मुद्दा मागे पडला.परंतु,आता मराठी विभागाचा एका संकुलात समावेश करून भाषा विकासाच्या मुद्याला अधिक मर्यादा येण्याची शक्यता आहे.त्यामुळे मराठीच्या स्वतंत्र संकुलाची मागणी पुढे आले आहे.

----

विद्यापीठातील मराठी विभागाला स्वतंत्र संकुलाचा दर्जा मिळाला पाहिजे.

विद्यापीठ स्थापने दृष्टीने जे पाऊल उचलले होते. त्यास हे सार्थक पाऊल ठरेल.

-डॉ. सुधाकर जाधवर, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

---

स्वतंत्र मराठी संकुलाचा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर अद्याप आला नाही. परंतु, हा विषय आल्यास विभागाला स्वतंत्र संकुलाचा दर्जा दिला जावा, अशी भूमिका व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडली जाईल.

- डॉ. संजय चाकणे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

--

स्वतंत्र संकुल उभारून मराठी भाषेच्या संवर्धन आणि ज्ञान निर्मितीच्या अंगाने पुढील काळात काम करता येईल. त्यामुळे विद्यापीठाच्या पुढील व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबत विस्ताराने चर्चा केली जाईल.

- राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Members of the Management Council adapt to the independent package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.