चार ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द

By Admin | Published: January 12, 2016 03:57 AM2016-01-12T03:57:00+5:302016-01-12T03:57:00+5:30

सलग सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस विनापरवाना गैरहजर राहिल्याने तसेच याबाबत खुलासाही न केल्याने

The membership of four Gram Panchayat members canceled | चार ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द

चार ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द

googlenewsNext


पुणे : सलग सहा महिन्यांपेक्षा
जास्त दिवस विनापरवाना गैरहजर राहिल्याने तसेच याबाबत खुलासाही न केल्याने आंबेगावच्या सुपेघर, जुन्नरच्या आपटाळेचे दोन व मुळशीच्या डावजे कातवाडी अशा
चार ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे आदेश सोमवारी
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिले.
अपटाळेचे भरत साबळे व मंदा साबळे, डावजे कातवाडीच्या मुक्ताबाई मानकर व सुपेघरच्या दीपिका तारडे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या तीनही ग्रामपंचायतींच्या या जागा रिक्त झाल्या आहेत.
भरत साबळे हे २२५, मंदा साबळे या २५७, मुक्ताबाई मानकर १८८ व दीपिका तारडे या ५६५ दिवस विनापरवाना गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मिळाल्यानंतर त्यांना लेखी व समक्ष खुलासा करावा, असे कळविण्यात आले. तरीही १५ दिवसांच्या मुदतीत खुलासा आला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांनी सदरची पद रिक्त झाल्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: The membership of four Gram Panchayat members canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.