रेखाचित्र प्रशिक्षणासाठी सीआयडी -भारती विद्यापीठात सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:09 AM2021-06-23T04:09:24+5:302021-06-23T04:09:24+5:30
पुणे : गुन्ह्यातील संशयित आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना आवश्यक असलेले रेखाचित्र प्रशिक्षणासाठी डॉ. गिरीश ...
पुणे : गुन्ह्यातील संशयित आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी महत्त्वाच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना आवश्यक असलेले रेखाचित्र प्रशिक्षणासाठी डॉ. गिरीश चरवड यांनी उपलब्ध करून देणे व आवश्यकतेप्रमाणे रेखाचित्र काढून देण्याकरिता गुन्हे अन्वेषण विभाग व भारती विद्यापीठ यांच्यात मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला. कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या निर्देशानुसार हा करार करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस अधीक्षक संभाजी कदम, पोलीस उपअधीक्षक अनुजा देशमाने, समन्वयक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डॉ. महादेव सगरे, रजिस्ट्रारजे जयकुमार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हनुमंत मुळावडे, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टचे प्राचार्य अनुपमा पाटील, प्रा. डॉ. गिरीश चरवड उपस्थित होते.
डॉ़ गिरीश चरवड हे गेल्या २८ वर्षांपासून पोलिसांना रेखाचित्र विनामोबदला काढून देण्याचे काम करीत आहेत़ त्यांची भारती विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे़ गुन्हे अन्वेषण विभागाने रेखाचित्र कक्षाची स्थापना केली आहे़ त्याअंतर्गत १८ पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या पहिल्या तुकडीचे गोपनीय प्रशिक्षण पूर्ण करुन त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.