शांताबाई शेळके यांचे स्मारक उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:10 AM2021-05-11T04:10:36+5:302021-05-11T04:10:36+5:30

८ मे रोजी शिवसेना सरपंच किरण राजगुरू व ग्रामस्थांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली, त्या ...

A memorial of Shantabai Shelke will be erected | शांताबाई शेळके यांचे स्मारक उभारणार

शांताबाई शेळके यांचे स्मारक उभारणार

Next

८ मे रोजी शिवसेना सरपंच किरण राजगुरू व ग्रामस्थांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली, त्या वेळी आढळराव पाटील यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात सर्व ग्रामपंचायत सदस्यांशी सविस्तर चर्चा करून प्रत्येकाची मते जाणून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शांताबाई शेळके यांचे बालपण मंचरमध्येच गेले होते. त्यांच्या साहित्यात ग्रामीण संस्कृतीचे दर्शन ठळकपणे जाणवते. त्यांच्या प्रतिभासंपन्न कविता व साहित्याने प्रत्येकालाच भुरळ पडते. कविता, गीत, चित्रपटगीत, कथा, कादंबरी, बालसाहित्य आदी विविध साहित्यप्रकारांत त्यांनी महाराष्ट्राला साहित्याचा अनमोल ठेवा उपलब्ध करून दिला आहे. त्यांचे बालपण मंचर शहरात गेल्याने येथेच त्यांच्या साहित्याची शिदोरी सर्वांसाठी खुली होऊन कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जीवनपटाची माहिती भावी पिढीला मिळावी या हेतूने मंचर शहरात त्यांचे दर्जेदार स्मारक व्हावे, अशी भावना असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.

Web Title: A memorial of Shantabai Shelke will be erected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.