वडिलांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्याने दिले विद्याधामला १०० झाडांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:10 AM2021-05-22T04:10:00+5:302021-05-22T04:10:00+5:30

कान्हूरमेसाई : वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण पिढ्यानपिढ्या कायम रहावी यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांने शाळेला शंभर झाडांची रोपे ...

In memory of his father, the student gave a gift of 100 trees to Vidyadham | वडिलांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्याने दिले विद्याधामला १०० झाडांची भेट

वडिलांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्याने दिले विद्याधामला १०० झाडांची भेट

googlenewsNext

कान्हूरमेसाई : वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण पिढ्यानपिढ्या कायम रहावी यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांने शाळेला शंभर झाडांची रोपे भेट दिली. शाळेने ‘माझी शाळा माझे झाड’ हा उपक्रम नुकताच सुरू केला असून त्या उपक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांने थेट शंभर झाडे दिल्याने शाळेच्या परिसर आता हिरवाईने नटण्यास सज्ज झाला आहे. कान्हूरसमेसाई येथील विद्याधाम शाळेमध्ये वडिलांच्या शाळेमध्ये एका विद्यार्थ्याने थेट

कान्हूर मेसाईच्या विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य यांनी विद्यालयात 'माझी शाळा... माझे झाड' हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या शाळेला किमान ५ झाडे भेट द्यावीत व विद्यालयाने शिक्षक आणि मुलांच्या मदतीने त्या झाडांचे संगोपन करून आपली शाळा वनश्रीने नटवावी असा हा उपक्रमाचा उद्देश आहे. विध्याधाम विद्यालयात नाईक म्हणून ३२ वर्ष सेवा केलेले कै. अर्जुन लांघे यांच्या मुलांनी उपक्रमास दाद देताना वडिलांची आठवण म्हणून आज विविध प्रकारची छोटी मोठी १०० झाडे स्वखर्चाने आज विद्यालयात पोहोच केली. दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या विध्यार्थ्यांना कै. अर्जुननाना लांघे स्मृतिचषक दिला जातो. झाडे देताना विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष जी. के. पुंडे माजी अध्यक्ष भास्कर पुंडे, सचिव सुदाम तळोले, विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी ह्या अनमोल भेटीबद्दल लांघे परिवाराचे आभार मानले.

--

फोटो २१ कान्हूरेमेसाई विद्याधाम प्रशाला

फोटोओळ : विद्यालयास स्वखर्चाने ही वृक्षवल्ली भेट देताना संतोष लांघे व ओंकार लांघे.

Web Title: In memory of his father, the student gave a gift of 100 trees to Vidyadham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.