महिला साह्यता कक्षाकडे पुरुषांच्या तक्रार अर्जांत वाढ, ५९७ अर्ज प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 03:41 AM2017-12-01T03:41:00+5:302017-12-01T03:41:09+5:30

दोघांमध्ये किरकोळ वाद, भांडण, मारहाण अशा गोष्टी घडल्या, की महिलांकडून तत्काळ पोलीस ठाण्याची पायरी गाठली जाते किंवा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला जातो.

 Men's complaint filed for women's assistance category, 577 applications pending | महिला साह्यता कक्षाकडे पुरुषांच्या तक्रार अर्जांत वाढ, ५९७ अर्ज प्रलंबित

महिला साह्यता कक्षाकडे पुरुषांच्या तक्रार अर्जांत वाढ, ५९७ अर्ज प्रलंबित

Next

- नम्रता फडणीस
पुणे : दोघांमध्ये किरकोळ वाद, भांडण, मारहाण अशा गोष्टी घडल्या, की महिलांकडून तत्काळ पोलीस ठाण्याची पायरी गाठली जाते किंवा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला जातो. मात्र, गुन्हा नोंदविण्यापूर्वी किंवा कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी समुपदेशनातून ही प्रकरणे सोडविण्यावर दिला जाणारा भर आणि जनजागृती या बाबींमुळे पोलीस आयुक्तालयातील महिला साह्यता कक्षाकडे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तक्रार अर्जांचे प्रमाण वाढले आहे. मागील दहा महिन्यांत कक्षाकडे १,९२० अर्ज दाखल झाले असून, यामध्ये पुरुषांच्या अर्जांचे प्रमाण अधिक आहे. परंतु, प्रत्येक अर्जाच्या चौकशीसाठी लागणारा कालावधी आणि त्यानंतर समुपदेशनासाठी होणारी ३ ते ४ सेशन्स यांमुळे जून ते आॅक्टोबरदरम्यान जवळपास ५९७ अर्ज कक्षाकडे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश वेळा घरांमधील व्यक्तीकडूनच महिलांना शारीरिक आणि मानसिक छळांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यासाठी कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्याअंतर्गत सासरच्या लोकांकडून सातत्याने होणाºया छळाविरोधात महिलांना थेट पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची तरतूद असल्याने महिलांच्या तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येते. किरकोळ वादविवाद, मारहाण, विवाहबाह्य संबंध, विसंवाद तसेच एकमेकांकडून घटस्फोटाची मागणी अशा कारणांसाठी पोलीस ठाण्यांसह न्यायालयामध्ये अर्ज दाखल होत आहेत.
मात्र, संसार मोडणे हा या कायद्याचा उद्देश नसल्याने पोलीस ठाणे आणि न्यायालयात अर्ज आल्यानंतर तातडीने संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविणे किंवा अर्जावर तत्काळ कारवाई केली जाण्याची प्रक्रिया केली जात नाही, तर सामोपचारातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. पोलीस ठाण्यांसह न्यायालयाकडे अर्ज आल्यानंतर ते अर्ज पोलीस आयुक्तालयाकडे पाठविले जातात. त्यानंतर ते अर्ज महिला साह्यता कक्षाकडे वर्ग केले जातात. हे अर्ज मिळाल्यानंतर तक्रारदार महिलेसह कुटुंबीयाचेदेखील एकत्रितपणे समुपदेशन केले जाते.

कायद्याचा दुरूपयोग : पुरूषांकडून तक्रार अर्ज

कित्येक वेळा महिलांकडून छोट्या-छोट्या कारणांसाठी कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याचे अनेकदा पाहायला मिळत असल्यामुळे पुरुषांकडूनही तक्रार अर्ज दाखल करण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षी महिला साह्यता कक्षाकडे ३२८ पुरुषांचे अर्ज दाखल झाले होते. यंदाच्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पुरुषांच्या अर्जाचे प्रमाण ४२३ इतके आहे. महिला साह्यता कक्षाकडे दाखल झालेल्या १,९२० अर्जांपैकी १,३२५ अर्जांची निर्गती झाली असली तरी जून ते नोव्हेंबरदरम्यानचे जवळपास ५९५ अर्ज चौकशीसाठी अद्यापही प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे.

महिला साह्यता केंद्राकडे आलेल्या अर्जांची रीतसर पडताळणी आणि चौकशी करून मगच संबंधित
व्यक्तींना दूरध्वनी करून समुपदेशनासाठी वेळ दिली जाते. मात्र, या समुपदेशनासाठी प्रत्येकी चार ते पाच सेशन्स होत असल्याने अर्जाच्या निर्गतीला काहीसा विलंब लागत आहे.
- कल्पना जाधव,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
महिला साह्यता कक्ष

Web Title:  Men's complaint filed for women's assistance category, 577 applications pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे