पुरुषांची क्षेत्रे महिलांकडून काबीज : डॉ.उत्तमराव भोईटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 07:28 PM2018-04-28T19:28:11+5:302018-04-28T19:28:11+5:30
स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर पत्नी अथवा वीर माता होण्यात नाही, तर वीर स्त्री होण्यात आहे.
पुणे: समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. तसेच स्त्री ही त्याग नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मूर्ती आहे. स्त्री कोणत्याच बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाही. तसेच पारंपारिक समजली जाणारी पुरुषांची क्षेत्रे आता महिला काबीज करत आहेत,असे मत भारती विद्यापीठाचे कार्यकारी संचालक डॉ.उत्तमराव भोईटे यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालच्या पदवी प्रदान समारंभात भोईटे बोलत होते. यावेळी डॉ. हरीष वनकुद्रे ,डॉ. सविता इटकर,डॉ. दीपाली गोडसे , डॉ.एस.आर. पाटील उपस्थित होते.
भोईटे म्हणाले, महाराष्ट्राला समाज प्रबोधनाची मोठी परंपरा असून शिक्षणातून समाज मन समृद्ध करण्याचे काम होते. सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून किरण बेदी, मीरा बोरवणकर, अंजू जॉर्ज, सानिया मिर्झा आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर पत्नी अथवा वीर माता होण्यात नाही, तर वीर स्त्री होण्यात आहे.
पदवी प्रदान समारंभात कम्प्युटर, इलेट्रॉनिक टेली कम्युनिकेशन,इन्फॉर्मशन टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.हरीश वनकुदर यांनी तर सूत्रसंचालन प्रा.यशोमती धुमाळ यांनी केले.