मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 18:03 IST2018-01-24T18:01:49+5:302018-01-24T18:03:52+5:30
जन्मत:च मतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोणी काळभोर : जन्मत:च मतिमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती आहे.
यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या मुलीचे आई-वडील मूळ गावातून मोलमजुरी करण्यासाठी येथे आलेले आहेत. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. तिची इतर भावंडे शाळेत जातात. ही अल्पवयीन मुलगी जन्मत:च मतिमंद आहे. तिला व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे ती घरीच असते. सलग दोन महिने तिला मासिक पाळी न आल्याने तिच्या आई-वडिलांनी सरकारी रुग्णालयात नेऊन तिची तपासणी केली. त्या वेळी ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तिच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले अधिक तपास करीत आहेत.