मतिमंद मुलीने ३३ वर्षांच्या तरुणीला दुसऱ्या मजल्यावरून फेकल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:10 AM2021-03-01T04:10:44+5:302021-03-01T04:10:44+5:30

पुणे : ऑटिसिझमची (आत्ममग्न) शिकार असलेल्या १४ वर्षांच्या मुलीने ३३ वर्षांच्या मुलीला उचलून दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देऊन तिचा ...

A mentally retarded girl threw a 33-year-old girl from the second floor and died | मतिमंद मुलीने ३३ वर्षांच्या तरुणीला दुसऱ्या मजल्यावरून फेकल्याने मृत्यू

मतिमंद मुलीने ३३ वर्षांच्या तरुणीला दुसऱ्या मजल्यावरून फेकल्याने मृत्यू

Next

पुणे : ऑटिसिझमची (आत्ममग्न) शिकार असलेल्या १४ वर्षांच्या मुलीने ३३ वर्षांच्या मुलीला उचलून दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून देऊन तिचा खून केला. ही घटना कोथरुडमधील सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान या संस्थेत शुक्रवारी दुपारी पावणेपाच वाजता घडली. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला असून, कोथरुड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ममता मोहन डोंगरे (वय ३३) असे मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. ममता ही गेली २० वर्षे या संस्थेत उपचार घेत होती, तर १४ वर्षांची मुलगी ही मूळची मुंबईची असून गेल्या १ महिन्यापासून तिला संस्थेत भरती करण्यात आले आहे.

याप्रकरणी सावली संस्थेतील रेक्टर अनिता टापरे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड रोडवरील डावी भुसारी कॉलनीमध्ये सावली संस्था १९९४ पासून मतिमंद व बहुविकलांग मुलांवर उपचार करत आहे. सध्या संस्थेत १७ मुले उपचार घेत आहेत. या तीन मजली इमारतीत मतिमंद व बहुविकलांग मुलांना वर खाली येता यावे यासाठी जिन्यात पायऱ्यांऐवजी रॅम्प केले आहेत. जेणेकरून ते धरून चालू शकतील.

ममता ही ३३ वर्षांची असली तरी शरीराने अतिशय बारीक आहे. तर आरोपी मुलगी १४ वर्षांची असली तरी ती शरीराने मजबूत आहे. ती अचानक हिंसक होते. संस्थेत असलेल्या बहुतेक मुलांना ऐकायला व बोलायला येत नाही.

शुक्रवारी दुपारी ममता दुसऱ्या मजल्यावरुन पडून जखमी झाली होती. तिला हॉस्पिटलमध्ये नेले असताना तिचा मृत्यू झाला. याची माहिती कोथरूड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिचे शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी संस्थेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात ममता ही दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या जिन्यातील रॅम्पवर चालत असताना याच संस्थेतील दुसरी १४ वर्षाच्या मुलीने ममता हिला पाठीमागून पकडून तिला उचलून दुसऱ्या मजल्यावरील जिन्यातून खाली फेकून दिल्याचे त्यात दिसून आले. कोथरुड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A mentally retarded girl threw a 33-year-old girl from the second floor and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.