आज दुकाने उघडण्यावर व्यापारी ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:11 AM2021-04-12T04:11:15+5:302021-04-12T04:11:15+5:30

विभागीय आयुक्त यांच्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांचा निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शासन व पुण्यातील स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या ...

Merchants insist on opening shops today | आज दुकाने उघडण्यावर व्यापारी ठाम

आज दुकाने उघडण्यावर व्यापारी ठाम

Next

विभागीय आयुक्त यांच्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्य शासन व पुण्यातील स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला पुणे व्यापारी महासंघाने तीव्र विरोध केला होता. त्यानंतर शुक्रवारीच व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याचा निर्धार केला होता. पण एक दिवस मुख्यमंत्र्यांना निर्णयासाठी वेळ द्यावा म्हणून त्यांनी सोमवारपासून (दि.१२) दुकाने उघडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार उद्यापासून शहरातील दुकाने उघडण्यावर व्यापारी ठाम असल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली.

शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, यासाठी पुणे व्यापारी महासंघ, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनाची विभागीय आयुक्त कार्यालयात रविवारी बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, यासह सचिव महेंद्र पितळिया महासंघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तब्बल दोन-अडीच तास चालेल्या बैठकी प्रशासनाने गंभीर परिस्थितीची जाणीव व्यापा-यांना करून दिली. परंतु गेल्या वर्षी तोट्यात गेलेला व्यापार आता सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाऊन लागले. व्यापाऱ्यांमुळे कोरोना वाढतो, अशी ओरड केली जाते; पण शहरात अनेक कारखाने, पेट्रोलपंप, रिक्षा, खाद्यपदार्थ, स्टॉल्सवर गर्दी आहे. नियमांचे पालन होत नाही. ज्यांच्यावर बंधने लादायला हवीत, त्यांना बंधने न घालता केवळ व्यापाऱ्यांवर बंधने घालणे हा अन्याय आहे. एप्रिल, मे महिन्यांत रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, गुढीपाडवा, अक्षयतृतीया यांसारखे महत्त्वाचे सण आहेत. यामुळे बैठकीत व्यापा-यांनी लाॅकडाऊनला कडाडून विरोध करत सोमवारी दुकाने सुरू ठेवण्यावर ठाम आहेत. दरम्यान रात्री उशिरापर्यंत व्यापारी महासंघाची राज्याची बैठक सुरू होती.

--------

शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ

रविवारी रात्री उशिरापर्यंत व्यापारी महासंघ व अन्य संघटनांशी झालेल्या बैठकीनंतर व्यापारी सोमवार (दि.12) आपली दुकाने उघडणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांच्या वतीने शहरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे.

Web Title: Merchants insist on opening shops today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.