ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात पुण्यातील व्यापारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:36+5:302021-09-17T04:14:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने ई-कॉमर्स क्षेत्रातील ...

Merchants in Pune against e-commerce companies | ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात पुण्यातील व्यापारी

ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात पुण्यातील व्यापारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) आणि पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांच्या विरोधात खराडी येथे ‘हल्ला बोल’ आंदोलन केले.

कैट महाराष्ट्रचे संयुक्त सचिव व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी ही माहिती दिली. ई-कॉमर्स क्षेत्रातील अमेझॉन व फ्लिपकार्ट सारख्या विदेशी कंपन्यांच्या मनमानी कारभाराला विरोध दर्शविण्यासाठी संपूर्ण देशभरातील व्यापारी हल्लाबोल आंदोलनात सहभागी झाले.

पुण्यातील खराडी येथे झालेल्या आंदोलनाला पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे पुणे शहराध्यक्ष विजय नरेला, महिला शहर उपाध्यक्ष आरती नरेला, संघटक अविनाश तांबे, संपर्क प्रमुख तानाजी डफळ आदी उपस्थित होते. ई-कॉमर्स क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे देशातील व्यापारी क्षेत्रातील वातावरण गढूळ होत आहे. सर्व व्यापाऱ्यांना कायद्याची चौकट आहे. मात्र, या ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांना मोकाट का सोडले आहे. त्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी संघटनेची भूमिका असल्याचे निवंगुणे यांनी सांगितले.

ई-कॉमर्समधील विदेशी कंपन्यांना आळा घातला नाही, तर देशातील रिटेल व्यवसायातील व्यावसायिक देशोधडीला लागतील आणि बेरोजगारी वाढेल. आधीच कोरोनामुळे व्यापारी हैराण झाले आहेत. त्यात या ई-कॉमर्समधील कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. सरकारने कायद्याने या कंपन्यांवर अंकुश आणावा, अशी व्यापाऱ्यांची मागणी असल्याचे निवंगुणे म्हणाले.

Web Title: Merchants in Pune against e-commerce companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.