राज्यात पारा चाळिशीपार, पुण्यात अजून नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:12 AM2021-03-31T04:12:01+5:302021-03-31T04:12:01+5:30

चंद्रपुरात सर्वाधिक ४३.६ अंश लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संपूर्ण विदर्भातील कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, आणखी दोन ...

Mercury is forty in the state, not yet in Pune | राज्यात पारा चाळिशीपार, पुण्यात अजून नाही

राज्यात पारा चाळिशीपार, पुण्यात अजून नाही

Next

चंद्रपुरात सर्वाधिक ४३.६ अंश

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संपूर्ण विदर्भातील कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, आणखी दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४३.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. राज्यातल्या अनेक गावांमध्ये पारा चाळिशीपार पोहोचला असताना पुण्यात मात्र अजूनही तापमान सरासरी ३५ ते ३८ अंशांदरम्यान आहे.

मंगळवारी सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १७.९ अंश सेल्सिअस होते. सोमवारी ब्रम्हपुरी येथे कमाल तापमान ४३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. ते देशातील सर्वाधिक कमाल तापमान ठरले होते. विदर्भाच्या बऱ्याच भागात तसेच कोकण, गोव्याच्या तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. बुलढाणा येथे सरासरीपेक्षा तब्बल ५.४ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात किंचित वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानात वाढ झाली आहे.

चौकट

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) - पुणे ३६.५, लोहगाव ३७.९, जळगाव ४०.५, कोल्हापूर ३५.५, महाबळेश्वर ३०.१, मालेगाव ४२, नाशिक ३५.८, सांगली ३६.९, सातारा ३७.३, सोलापूर ४०.२, मुंबई ३२.८, सांताक्रुझ ३२.६, अलिबाग ३४, रत्नागिरी ३२.८, पणजी ३४.३, डहाणु ३३.१, औरंगाबाद ३९.६, परभणी ४०.५, नांदेड ४०, अकोला ४१.७, अमरावती ४२.२, बुलढाणा ४१, ब्रम्हपुरी ४३, चंद्रपूर ४३.६, गोंदिया ४२, नागपूर ४१.९, वाशिम ४१, वर्धा ४२.२़

Web Title: Mercury is forty in the state, not yet in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.