सराफ बाजारात पुन्हा ‘दिवाळी’

By Admin | Published: November 10, 2016 01:28 AM2016-11-10T01:28:42+5:302016-11-10T01:28:42+5:30

केंद्र सरकारच्या पाचशे आणि एक हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा शहरातील सराफ ी व्यावसायिकांना चांगलाच

Mercury hits record high on Diwali | सराफ बाजारात पुन्हा ‘दिवाळी’

सराफ बाजारात पुन्हा ‘दिवाळी’

googlenewsNext

पिंपरी : केंद्र सरकारच्या पाचशे आणि एक हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचा शहरातील सराफ ी व्यावसायिकांना चांगलाच फ ायदा घेतला आहे़ पिंपरी कॅम्प, चिंचवडगाव, काळेवाडी, वाकड, भोसरी, निगडी, आकुर्डी परिसरातील अनेक सराफ ी दुकाने रात्री अडीचपर्यंत सोने विक्रीसाठी उघडी ठेवली होती़ तसेच, चढ्या भावाने सोन्यांची विक्री केली.
पिंपरी-चिंचवड शहरात निर्णयाची बातमी टीव्ही व सोशल मिडियाद्वारे मंगळवारी रात्री वा-यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ संभ्रम व भितीचे वातावरण निर्माण झाले होते.अनेकांनी आपल्याकडील नोटांच्या बदल्यात सोने खरेदीला प्राधान्य दिले़ मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ३१ हजार ६०० रुपये असताना प्रत्यक्षात अनेक सराफ ांनी तीन ते चार हजार रुपये प्रति दहा ग्रॅम सोने विक्री केल्याची चर्चा आहे.
सोन्याचा दर अधिक असतानाही ग्राहकांनी सोने खरेदी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती़ सराफ व्यावसायिकांनी अनोखी शक्कल वापरल्यामुळे त्यांचे सोने झाल्याची चर्चा होती़ (प्रतिनिधी)

Web Title: Mercury hits record high on Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.