सव्वातीन हजार मृत्यू लपविले की आकडेवारीत घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:13 AM2021-04-28T04:13:17+5:302021-04-28T04:13:17+5:30
राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे म्हणाले "हा फरक पोर्टलवर आकडेवारी अपडेट करण्यामुळे येतो. आम्ही केंद्राच्या पोर्टलवरील आकडेवारी ...
राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे म्हणाले "हा फरक पोर्टलवर आकडेवारी अपडेट करण्यामुळे येतो. आम्ही केंद्राच्या पोर्टलवरील आकडेवारी गृहीत धरतो. त्यावर जिल्ह्याकडची आकडेवारी रोज अपडेट होईल असे नाही. त्यामुळे हा फरक दिसतो. "
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले " आकडेवारीमध्ये असलेला फरक हा पत्ता शोधण्यावरून होतो आहे. त्या माणसाचा पत्ता सापडेपर्यंत आकडेवारीमध्ये नोंद केली जात नाही. हा फरक कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान पुण्यात मृत झालेल्या व्यक्तींची नोंद ही पुण्याची म्हणून नोंद केली जाते तर ती व्यक्ती दुसरीकडची असू शकते म्हणजे इतर जिल्ह्यातील व्यक्ती इथे ट्रीटमेंट घेतात त्यांची नोंद इथले मृत्यू म्हणून होते. त्याचा परिणाम म्हणून हा फरक दिसतो आहे."