कोरोना काळात युवकाने दिला " बी पॉझिटिव्ह " चा संदेश ; पोलिसांनी पण त्याच्या "या" विधायक कार्याला केला "सॅल्यूट"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 11:00 PM2020-05-08T23:00:00+5:302020-05-08T23:00:02+5:30

भूगाव येथील रहिवासी असलेल्या पंकज गुप्ता याची सायकल ही '' पॅशन '' आहे.

The message of B-positive given by the youth during the Corona period | कोरोना काळात युवकाने दिला " बी पॉझिटिव्ह " चा संदेश ; पोलिसांनी पण त्याच्या "या" विधायक कार्याला केला "सॅल्यूट"

कोरोना काळात युवकाने दिला " बी पॉझिटिव्ह " चा संदेश ; पोलिसांनी पण त्याच्या "या" विधायक कार्याला केला "सॅल्यूट"

Next
ठळक मुद्देसायकलिंगची आवड जोपासण्याबरोबरच रक्तदानाच्या माध्यमातून त्याने सामाजिक बांधिलकी

नम्रता फडणीस- 
पुणे : एकीकडे कोरोना काळात रिकामटेकडे युवक विनाकारण घराबाहेर पडताना पोलिसांच्या लाठ्यांचे धनी होत आहेत तर दुसरीकडे पुण्यातीलच एका तरूणाने रक्तदानासाठी सायकलवर रूग्णालय गाठत इतर तरूणांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, रक्तदान करून सायकलवरून घरी परत जाताना पोलिसांनी त्याच्या या विधायक कार्याला '' सॅल्यूट'' केला  आहे. यासायकलपटूचे नाव आहे पंकज गुप्ता...
    भूगाव येथील रहिवासी असलेल्या पंकज गुप्ता याची सायकल ही '' पॅशन '' आहे. तो ऑफिसला देखील सायकलनेच जातो. सायकलिंगची आवड जोपासण्याबरोबरच रक्तदानाच्या माध्यमातून त्याने सामाजिक बांधिलकी देखील  जपली आहे. आजवर सायकलपटूंनी वेगवेगळ्या मोहिमा पार पाडत पुण्याची मान अभिमानाने उंचावली आहे. आपत्ती काळातही मदतीसाठी पुढाकार घेण्यात सायकलपटू मागे नाहीत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. कोरोना काळात काही बिनकामी युवक मंडळी घराबाहेर पडण्याचे बहाणे शोधत आहेत. अशांना पोलिसांकडून लाठ्यांचा प्रसाद देखील मिळत आहे. पण समाजात पंकज गुप्ता याच्यासारखे काही तरूण असेही आहेत की तेया संकट काळात मदतीसाठी खारीचा वाटा उचलत आहेत. सध्या शहरात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. काही रक्तपेढ्या आणि स्वयंसेवी संस्था रूग्णालयाच्या मदतीने रक्तदान शिबिरे आयोजित करीत आहेत. यासाठी रक्तदात्यांचे व्हॉटस अप ग्रृप देखील तयार करण्यात आले आहेत. यासंदर्भात पंकज गुप्ता याने '' लोकमत'' ला सांगितले की,  गिरीप्रेमी आणि श्रीस्वरूप सेवा संस्था यांनी तयार केलेल्या ग्रृपला मी जॉईन झालो. त्यावेळी दोनखासगी रूग्णालयांना ''बी पॉझिटिव्ह'' रक्ताची गरज होती. त्यामुळे मला त्यातील एका रूग्णालयामध्ये जाण्यास सांगण्यात आले. याकरिता मी पुणे पोलिसांच्या व्हॉटअप ग्रृपला पाससाठी अर्ज केला आणि रक्तदाता असल्याचे सांगितले. पोलिसांनी माझा अर्ज तात्काळ मंजूर केला. त्यावेळी वैयक्तिक वाहन वापरायला बंदी होती. त्यामुळे मी सायकलवरून गेलो. भूगाव ते चांदणीचौक, पौड फाटा, अभिनव चौक मार्गे दीनानाथ मंगेशकर गाठले. तिथे गेल्यावर
माझी थोडीफार चौकशी केली. माझी माहिती लिहून घेतली. कोव्हिडचा स्पेशल्फॉर्म भरून घेतला. कुठल्या परदेशाहून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातआलेला नाही ना? अशी विचारणा झाली. त्यानंतर मग रक्तदान केले. रक्तदानकेल्यानंतर भूगावला जाताना पोलिसांनी अडवले आणि त्यांना '' कॉल ब्लड डोनर''आहे असं सांगितल्यावर त्यांनी कौतुक केले. आपण इतरांच्या मदतीला उपयोगी पडत आहोत याचाच आनंद अधिक होता. त्यामुळे रक्तदान करून सायकल चालविताना कोणताही त्रास जाणवला नाही.
----------------------------------

Web Title: The message of B-positive given by the youth during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.