तरुणाईनेदिला ‘नो कोरोना’ आणि ‘दारु नको दूध प्या... चा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:08 AM2021-01-01T04:08:00+5:302021-01-01T04:08:00+5:30

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षात नो कोरोना... आणि दारु नको दूध प्या... चा संदेश ...

The message of 'No Corona' and 'Don't drink alcohol, drink milk ...' to the youth | तरुणाईनेदिला ‘नो कोरोना’ आणि ‘दारु नको दूध प्या... चा संदेश

तरुणाईनेदिला ‘नो कोरोना’ आणि ‘दारु नको दूध प्या... चा संदेश

Next

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षात नो कोरोना... आणि दारु नको दूध प्या... चा संदेश तरुणाईने दिला. नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे, याकरीता नववर्षाच्या पूर्वसंध्येला विविध सामाजिक संस्था आणि महाविद्यालयांतील तरुणाईने युथ अगेन्स्ट अ‍ॅडिक्शनचा संदेश दिला. कोरोना विषाणूच्या वेशातील कलाकारांनी नो कोरोना... आणि दारु नको, दूध प्या असे म्हणत केलेले प्रबोधन आणि रस्त्यावर उतरुन लक्षणीय सहभाग घेत फलकांद्वारे जनजागृती करीत सरत्या वर्षाला निरोप दिला.

आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, कात्रज डेअरी आणि पुणे शहर पोलीस वाहतूक विभागातर्फे डेक्कन जवळील गुडकल चौकात नो कोरोना आणि दारु नको, दूध प्या या कार्यक्रमांतर्गत जनजागृती आयोजन केले. यावेळी खासदार गिरीष बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका निलीमा खाडे, संतोष राजगुरु, केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, अनिरुद्ध हळंदे, दत्तात्रय सोनार, राजन चांदेकर, महेश वाडेकर, विवेक राजगुरु, हर्षल पंडित, राहुल बोंबे, प्रकाश पवार, अमित शिंदे, प्रा. सुशील गंगणे उपस्थित होते.

Web Title: The message of 'No Corona' and 'Don't drink alcohol, drink milk ...' to the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.