स्नेहसंमेलनातून दिला ‘पाणी वाचवा’चा संदेश
By Admin | Published: March 30, 2017 12:00 AM2017-03-30T00:00:11+5:302017-03-30T00:00:11+5:30
शितोळेवस्ती शाळेचे स्नेहसंमेलनात (जल्लोष २०१७) शिवराज्यभिषेक, पाणी वाचवा तसेच दुष्काळ, इंग्रजी नाटके, मराठी
राजेगाव : शितोळेवस्ती शाळेचे स्नेहसंमेलनात (जल्लोष २०१७) शिवराज्यभिषेक, पाणी वाचवा तसेच दुष्काळ, इंग्रजी नाटके, मराठी लावण्या, लोकगीते महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा गीत इत्यादी कलाविष्कार सादर करण्यात आले.
खडकी परिसरातील शितोळेवस्ती शाळेचे स्नेहसंमेलन (जल्लोष २०१७) उत्साहात पार पडले. पालकांचा व पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला.
शाळेच्या पटांगणामधे यात्रेला जमावी तशी गर्दी दिसत होती. मुलांवर कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव करताना नकळत प्रेक्षक मुलांबरोबर ठेका धरताना दिसत होते. मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. संध्याकाळी ७.३० ते रात्री १२ पर्यंत एकही जण जागेवरून उठला नाही.
पंचायत समितीच्या सभापती मीनाताई धायगुडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सारिका पानसरे, पंचायत समिती सदस्य प्रकाश नवले, सहायक विक्रीकर आयुक्त दत्तात्रय भिसे, गटशिक्षणाधिकारी गौतम बेलखेडे, सरपंच मंगेश शितोळे, उपसरपंच जावेद पठाण, सदस्या मीरा काळे, व्हाईस चेअरमन संतोष मचाले, नीलेश शितोळे, प्रशांत काळे, सूर्यकांत शितोळे, गोविंद शितोळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदयसिंग शितोळे, उपाध्यक्ष समीर शितोळे सर्व सदस्य उपस्थित राहून पाठीवर कौतुकाची थाप दिली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेवर काम करून विद्यार्थी घडविण्याच्या कामात आणि एकूणच गावाच्या जडणघडणीमध्ये हातभार लावलेल्या शाळा व्यवस्थापन माजी अध्यक्ष मंगेश शितोळे, माजी उपाध्यक्ष संतोष शितोळे, माजी उपाध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी केलेल्या शैक्षणिक योगदानाबद्दल ‘कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, शिक्षकांनाही कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ज्ञानेश्वर भापकर, सोमनाथ पांढरे, किरण जांबले, संगीता गोंडगे यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.
शाळेतून बदली होऊन गेलेले राजाराम सोनवणे, ज्ञानदेव काळे, अप्पासाहेब भोरे, पांडुरंग खाटमोडे, दीपक कदम, सचिन वालतुरे, राणी कोतवाल उपस्थित राहिले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर असलेली आपुलकीची भावना आणि डोळ्यांतून आमच्यावर होणारा शुभेच्छांचा वर्षाव आम्ही याचि देही याचि डोळा अनुभवू शकलो.