#Metoo : सिंबायाेसिसच्या विद्यार्थीनीसुद्धा लैेंगिक अत्याचाराच्या बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:51 PM2018-10-10T12:51:40+5:302018-10-10T13:15:51+5:30
सिंबायाेसिस सेंटर फाॅर मिडीया अॅन्ड कम्युनिकेशन विभागातील अाजी व माजी विद्यार्थिनींनी साेशल मिडीयावर लिहीत सिंबायाेसिसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हंटले अाहे.
पुणे : हॅशटॅग मी टू ही चळवळ अाता शिक्षणक्षेत्रातही पसरली अाहे. अभिनेत्री, पत्रकार यांनी समाेर येत अापल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना सांगितल्यानंतर अाता पुण्यातील नामांकित सिंबायाेसिस महाविद्यालयातील विद्यार्थींनी अापले अनुभव कथन केले आहेत. सिंबायाेसिस सेंटर फाॅर मिडीया अॅन्ड कम्युनिकेशन विभागातील अाजी व माजी विद्यार्थिनींनी साेशल मिडीयावर लिहीत सिंबायाेसिसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हंटले अाहे. यावर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना अाेपन लेटर लिहीत लैेंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत महाविद्यालयातील समितीकडे तक्रार नाेंदविण्यास सांगितले अाहे.
हॅशटॅग मी टू ही अमेरिकेत सुरु झालेली चळवळ भारतातही माेठ्याप्रमाणावर पसरत अाहे. या चळवळीतून अनेक अभिनेत्री, पत्रकारांनी अापल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना वाच्यता फाेडली अाहे. या चळवळीमुळे अनेक महिला लैेंगिक अत्याचाराविराेधात पुढे येत अाहेत. गेल्या दाेन तीन दिवसांपासून पुण्यातील नावजलेल्या सिंबायाेसिस सेंटर फाॅर मिडीया अॅन्ड कम्युनिकेशन विभागातील अाजी व माजी विद्यार्थीनींनी साेशल मिडीयावर अापले अनुभव कथन केले अाहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली अाहे. सिंबायाेसिसकडून साेशल मिडीयावर विद्यार्थ्यांना अाेपन लेटर लिहीण्यात अाले असून विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचाराला सामाेरे जावे लागत असल्यास त्यांनी महाविद्यालयाच्या समितीकडे तक्रार नाेंदवावी असे अावाहन करण्यात अाले अाहे. फेसबुकवर लिहीलेल्या या पत्रात कमिटीतील सदस्यांची नावे देण्यात अाली अाहेत. तसेच विद्यार्थीनींचे नाव गाेपनीय ठेवण्यात येईल असेही सांगण्यात अाले अाहे.
याबाबत बाेलताना सिंबायाेसिसच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर म्हणाल्या, साेशल मिडीयाच्या माध्यमातून विद्यार्थीनी तक्रार करत अाहेत. या तक्रारी अाम्ही साेशल मिडीयाच्या माध्यामातून वाचत अाहाेत. या तक्रारींकडे सिंबायाेसिस गांभिर्याने बघत अाहे. अाज सकाळी सिंबायाेसिची उच्चस्तरीय कमिटीने तातडीने बैठक घेऊन या तक्रारींची दखल घेतली. विद्यापीठाची अंतर्गत समिती या तक्रारींबाबत पाऊले उचलत अाहे.अाज दुपारी एक बैठक हाेणार असून यात या सर्व तक्रारींच्या तपासाबाबत चर्चा करण्यात येणार अाहे.