#MeToo: सिम्बायोसिसच्या दोन प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 12:11 PM2018-10-22T12:11:47+5:302018-10-22T12:15:02+5:30
संचालक अनुपम सिद्धार्थ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले असताना आज आणखी दोन प्राध्यापकांना निलंबित करण्य़ात आले आहे.
पुणे : सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही. संचालक अनुपम सिद्धार्थ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले असताना आज आणखी दोन प्राध्यापकांना निलंबित करण्य़ात आले आहे.
पुण्यातील सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीच्या 10 विद्यार्थिनींनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक शोषण, तसेच गैरवर्तनाचा प्रकार समोर आणला होता. त्यानतंर विद्यापीठाने अंतर्गत चौकशी समिती नेमून त्याबाबत चौकशीही सुरू केली. पण गैरवर्तन, तसेच मानसिक छळाला सामोरे जावे लागलेल्या अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आता उघडपणे याबाबतची तक्रार केली आहे. सुमारे १०० हून अधिक विद्यार्थिनींनी संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासन विभागाचे अधिष्ठाता डॉ. भामा वेंकटरमणी यांच्याकडे अनुपम सिद्धार्थ यांच्याविषयी ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. संस्थेच्या बंगळुरू येथील आवारातील एक लैंगिक शोषणाचा प्रकारही दडपल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
या पार्श्वभुमीवर आज आणखी दोन प्राध्यापकांवर चौकशी समितीने कारवाई केली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.