#MeToo ते #WeToo वर होणार विचारमंथन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 12:57 AM2018-10-23T00:57:05+5:302018-10-23T00:57:26+5:30
लोकमत विमेन समिटचे सातवे पर्व पुण्यात शुक्रवारी (२६ आॅक्टोबर) आयोजित करण्यात आले आहे.
पुणे : लोकमत विमेन समिटचे सातवे पर्व पुण्यात शुक्रवारी (२६ आॅक्टोबर) आयोजित करण्यात आले आहे. #MeToo ते #WeToo ‘ती’ ची बोलण्याची ताकद या संकल्पनेवर आधारित विचारमंथन या निमित्ताने होणार आहे. युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्इहलपमेंट गोल्स, युनिसेफ यांच्या सहयोगाने होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाला महिलाशक्तीचे प्रतिनिधित्व करण्याºया आणि आपापल्या कार्यक्षेत्रात भरीव योगदान देणाºया महिलांचा समावेश होणार आहे.
>मेरी रझानाद्रासोवा, मादागास्करच्या भारतातील राजदूत
विविध देशांतील स्त्रियांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस पावले मेरी रझानाद्रासोवा यांनी उचलली आहेत. एक मुत्सद्दी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून त्यांची कामगीरी उल्लेखनीय आहे.
>पद्मश्री सुधा वर्गिस,
संस्थापक, प्रेरणा फाउंडेशन
मुसाहार समाजाच्या मुलींसाठी ‘नारी गुंजन’च्या माध्यमातून आहार, स्वच्छता आणि अर्थ व्यवस्थापन याविषयी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण पद्मश्री सुधा वर्गिस यांनी दिले. पटना येथे मुलींसासठी त्यांनी प्रेरणा या निवासी शाळेची स्थापना केली. अतिशय अल्प भांडवल, जागा आणि प्राथमिक सुविधांचा अभाव असताना पेरलेल्या या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे. २००६ साली भारत सरकारने त्यांन त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीप्रित्यर्थ ‘पद्मश्री’ हा किताब बहाल केला.
>राणी मुखर्जी
१९९० नंतरची पडद्यावरील कारकीर्द अभिनेत्रीच्या रुपात गाजवणाºया राणी मुखर्जीने महिलांना त्यांचा आवाज बुलंद करण्याची प्रेरणा देणाºया अनेक भूमिका साकारल्या विमेन समिट’ च्या निमित्ताने तिच्या सक्षमिकरणाविषयी असलेला दृष्टीकोन आणि तिचे बहुआयामी व्यक्तिमत्व जाणून घेण्याची अनोखी संधी महिलांना मिळणार आहे.
>उषा काकडे, संचालिका, यूएसके फाऊंडेशन
लहानग्यांवर लैंगिक अत्याचार होऊ नयेत किंवा पूर्वायुष्यात असे अनुभव आले असल्यास अशा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी
‘गुड टच बॅड टच’ चे प्रशिक्षण सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांना देणाºया उषा काकडे यांचे अनुभव जाणून घेण्याची संधी महिलांना मिळणार आहे.
>अंतरा गांगुली, जेंडर स्पेशालिस्ट, युनिसेक
युनिसेफद्वारे राबविण्यात येणाºया आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छता, बालहक्क संवर्धन आणि पोषण आहार या विषयाशी सलग्न असलेल्या उपक्रमांचे आयोजन व अंमलबजावणी यात मोलाची भूमिका अंतरा गांगुली बजावत आहेत. न्यू यॉर्क येथे स्त्रियांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी त्यांनी अनेक उपक्रमांचे आयोजन केले. या प्रकारचे उपक्रम ८९ देशांत राबविले गेले. याकार्यात अंतरा गांगुली यांचा मोठा वाटा आहे.
>रेखा शर्मा, अध्यक्ष, नॅशनल कमिशन फॉर विमेन
महिला कै द्यांचे पुनर्वसन व त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी लढा देण्याचे कार्य रेखा शर्मा यांनी केले. अनिवासी भारतीय पुरुषांनी दुर्लक्षित केलेल्या परित्यक्तांना त्यांच्या अधिकारांची जाणीव निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. त्यांनी ‘हरियाणा महिला उत्थान समिती’ची स्थापना केली असून या महिलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहे.
>लोकमत विमेन समीटच्या निमित्ताने आपल्या प्रतिक्रिया ‘लोकमत’च्या अधिकृत ट्विटर हॅँडलवर (@MiLokmat) वर व्यक्त करा आणि #LokmatWomenSummitवर टॅग करा.
या परिषदेत सहभागी होण्यासाठी ५ हजार रुपये नोंदणी शुल्क आहे. नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींना ५० टक्के सवलत आहे. सहभागी होण्यासाठी सहभागासाठी संपर्क करा : 9172109047, Email : ucha.bakre@lokmat.com येथे संपर्क साधावा. प्रवेश फक्त निमंत्रितांसाठी आहे. लोकमत विमेन समीटच्या निमित्ताने राज्यस्तरीय सखी सन्मान पुरस्कारांचे वितरण यावेळी होणार आहे.