#MeToo ते #WeToo - तीचा बुलंद आवाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 01:24 AM2018-10-22T01:24:15+5:302018-10-22T01:24:24+5:30
महिलाशक्तीच्या अविष्काराची ओळख बनलेल्या ‘लोकमत विमेन समीट’चे सातवे पर्व शुक्रवारी (२६ आॅक्टोबर) होणार आहे.
पुणे : महिलाशक्तीच्या अविष्काराची ओळख बनलेल्या ‘लोकमत विमेन समीट’चे सातवे पर्व शुक्रवारी (२६ आॅक्टोबर) होणार आहे. ‘#MeToo ते ##WeToo तीची बोलण्याची ताकद’ ही या विमेन समीटची यंदाची संकल्पना आहे. युनिसेफच्या सहयोगाने होणाऱ्या या समीटमध्ये होणाºया चर्चेत मीटू चळवळीला बळ देत ‘ती’ची बोलण्याची ताकद वाढवितानाच समाजाच्या सहभागातून या चळवळीचे स्वरूप ‘वुई टुगेदर’ करण्यासाठी विचारमंथन होणार आहे.
मादागास्करच्या भारतातील राजदूत मेरी लिओन्टाईन रझानाद्रासोवा, प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी, राधिका आपटे, तनुश्री दत्ता, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा
डॉ. उषा काकडे, प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापक पद्मश्री सुधा वर्गिस, कनकधारा फाउंडेशनच्या संस्थापक
डॉ. लक्ष्मी गौतम, राष्टÑीय
महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, शाश्वत विकास आणि जलव्यवस्थापन तज्ज्ञ रूपाली देशमुख, युनिसेफच्या जेंडर स्पेशालिस्ट अंतरा गांगुली,
गुलाबी गॅँगच्या संस्थापक संपत पाल देवी, आशियातील पहिली महिला टॅक्सी संघटना फॉरचीच्या संस्थापक रेवती रॉय, भारतातील सर्वांत तरुण सरपंच जबना चौहान, उद्योजिका आणि युनायटेड नेशन्सच्या यंग अचिव्हर मानसी किर्लोस्कर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.
महिलांच्या प्रश्नांचे स्वरूप वैश्विक आहे. महिलांनी विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले. तरीसुद्धा दिवसेंदिवस त्यांच्यावरील अत्याचारांत वाढ होत आहे. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक शोषणासारख्या घटना घडत आहे. महिलांसाठी असुरक्षित वातावरण तयार होत आहे. पण अंधार दाटल्यासारखा वाटत असताना ‘मीटू’ ही चळवळीसारख्या किरण शलाका निघत आहे. पण त्यापुढे जाऊन ‘वुईटू’ म्हणत समाजानेही या प्रश्नांकडे सजगपणे पाहण्यासाठी वातावरण तयार व्हायला हवे. यासारख्या विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.
गेली ६ वर्षे सातत्याने महिला सक्षमीकरणाची चळवळ उभी करणाºया कर्तबगार महिला या राष्ट्रीय परिषदेत सहभागी झाल्या आहेत. याच यशोगाथेचा पुढील टप्पा म्हणून स्त्रीत्वाचा अनोखा आविष्कार यंदाच्या ‘विमेन समीट’मध्ये अनुभवायला मिळणार आहे.
लोकमत विमेन समीटच्या निमित्ताने आपल्या प्रतिक्रिया ‘लोकमत’च्या अधिकृत ट्विटर हॅँडलवर (@MiLokmat) वर व्यक्त करा आणि #LokmatWomenSummit वर टॅग करा.
या परिषदेत सहभागी होण्यासाठी ५ हजार रुपये नोंदणी शुल्क आहे. नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींना ५० टक्के सवलत आहे.
सहभागी होण्यासाठी सहभागासाठी संपर्क करा : 9172109047,
Email : rucha.bakre@lokmat.com येथे संपर्क साधावा. प्रवेश फक्त निमंत्रितांसाठी आहे.
लोकमत विमेन समीटच्या निमित्ताने राज्यस्तरीय सखी सन्मान पुरस्कारांचे वितरण यावेळी होणार आहे.