पुण्यातील वाहतूककोंडी भेदण्याला मेट्रोचा हातभार : निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 01:40 PM2019-07-11T13:40:49+5:302019-07-11T13:51:08+5:30

महामेट्रो कंपनीने ती सोडवण्यासाठी वाहतूक शाखेच्या साह्याने स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे..

Metro contributes to ttraffic problems solved in Pune | पुण्यातील वाहतूककोंडी भेदण्याला मेट्रोचा हातभार : निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती

पुण्यातील वाहतूककोंडी भेदण्याला मेट्रोचा हातभार : निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती

Next
ठळक मुद्देपुण्यात वाहतूक शाखेत काम केलेल्या सुमारे १५ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीमदोन मेट्रो मार्ग तयार करण्याचे काम सध्या सुरू मेट्रोच्या कामामुळे शहरात सातत्याने वाहतूककोंडी होत असल्याची टीका

पुणे: मेट्रोच्या कामामुळे शहरात सातत्याने वाहतूककोंडी होत असल्याची टीका लक्षात घेऊन महामेट्रो कंपनीने ती सोडवण्यासाठी वाहतूक शाखेच्या साह्याने स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. तातडीचे प्रतिसाद पथक म्हणून एक पथक स्थापन केले आहे. पुण्यात वाहतूक शाखेत काम केलेल्या सुमारे १५ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीमच तयार केली आहे.
वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असे ३१ किलोमीटर अंतराचे दोन मेट्रो मार्ग तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट, कृषी महाविद्यालय ते स्वारगेट व वनाज ते सिव्हिल कोर्ट, सिव्हिल कोर्ट ते रामवाडी असे या दोन्ही मार्गाचे चार भाग तयार केले आहेत. त्यातील कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या ५ किलोमीटरच्या भुयारी मार्गाचे काम अद्याप सुरू व्हायचे आहे. मात्र, वनाज ते रामवाडी व पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट, सिव्हिल कोर्ट ते रामवाडी या तिन्ही मागार्चे काम जोरात सुरू आहे. याच तीन मार्गांवर सातत्याने वाहतूककोंडी होत आहे.
रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंना पत्र्यांचा आडोसा करून काम सुरू असते. त्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. त्यातच पावसाने रस्त्यांना खड्डे पडले आहेत. मोठी वाहने त्यात अडकून पडतात. वनाजपासून पुढे एसएनडीटी महाविद्यालयाजवळचा कर्वे रस्ता एका बाजूने वाहतूकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे वळसा घालून वाहनांना जावे लागते. या सर्व कारणांमुळे कर्वे रस्ता, गरवारे महाविद्यालय, करिष्मा सोसायटी, पौंड रस्ता, सिव्हिल कोर्ट, कृषी महाविद्यालय अशा अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबते आहे.
ही बाब लक्षात घेऊन महामेट्रो कंपनीने पुण्यात वाहतूक शाखेत काम केलेल्या सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या किशोर कारंडे, सुभाष जांभळे, महादेव गावडे, राजेंद्र सावंत अशा ४ अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. त्यांना चार मार्ग दिले आहेत. त्यांच्या साह्याला वाहतूक शाखेतच काम केलेले पोलिस निरीक्षक दजार्चे ४ ते ५ निवृत्त अधिकारी दिले आहेत. या निरीक्षकांनी प्रत्येकी ३० ते ४० ट्रॅफिक वॉर्डन दिलेले आहेत. प्रत्येक मार्गावर हे अधिकारी व वॉर्डन कार्यरत असतात. कोंडी होऊ नये यासाठी नियंत्रणाचे काम करतात. वाहतूककोंडी झाली की तिथे हे वॉर्डन नियंत्रणाचे काम करतात. त्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांना साह्य करतात. त्यांना स्वतंत्र गणवेश, शिट्टी, ओळखपत्र देण्यात आले आहेत.
याशिवाय क्विक रिस्पॉन्स टीम म्हणून चार जीप या पथकांच्या मदतीला दिल्या आहेत. त्यात प्रत्येकी ४ वॉर्डन असतात. त्याशिवाय प्रथमोपचाराचे सर्व साहित्य असते. अपघाताची माहिती मिळताच सर्वात जवळ असलेले वाहन तिथे त्वरीत पाठवण्यात येते व काम सुरू करते. जखमींना उपचार करणे, जास्त जखमी असतील तर त्यांना लगेच रुग्णालयात पोहचवणे, अपघातातील वाहनामुळे रस्ता अडला असेल तर वाहन बाजूला करणे ही कामे या टीमकडून केली जातात. 
........
त्वरीत प्रतिसाद पथकाची स्थापना 
शहरातील अन्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असली तरी मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी ती सातत्याने होत आहे. त्यामुळे मेट्रोबाबत नागरिकांमध्ये रोषाची भावना तयार होऊ नये यासाठी महामेट्रो कंपनीकडून काळजी घेण्यात येत आहे. तरीही वाहनांची एकूण संख्या, वाहनधारकांकडून होत असलेला नियमभंग यामुळे वाहतूककोंडीवर आणखी प्रभावी उपाय अंमलात आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Web Title: Metro contributes to ttraffic problems solved in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.