मेट्रो-‘एचसीएमटीआर’ ‘पीएमआरडीए’मध्ये नको

By admin | Published: May 30, 2015 01:00 AM2015-05-30T01:00:54+5:302015-05-30T01:00:54+5:30

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) करण्यास पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी आज विरोध केला.

Metro- 'HCMTR' is not in PMRDA | मेट्रो-‘एचसीएमटीआर’ ‘पीएमआरडीए’मध्ये नको

मेट्रो-‘एचसीएमटीआर’ ‘पीएमआरडीए’मध्ये नको

Next

पुणे : बहुचर्चित मेट्रो प्रकल्प व शहरा- अंतर्गत रिंगरोड (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रोड) या दोन्ही प्रकल्पांचा समावेश पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) करण्यास पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी आज विरोध केला.
‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष व पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाच्या सदस्यांची दुसरी बैठक शुक्रवारी झाली. त्यावेळी पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पीएमआरडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
मेट्रो व ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पांचा समावेश ‘पीएमआरडीए’मध्ये करण्याच्या विषयावर बैठकीत चर्चा झाली. त्या वेळी दोन्ही महापालिकांच्या महापौरांनी प्रकल्पांचा समावेश व अधिकार पीएमआरडीएला देण्यास विरोध दर्शविला.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून जाणारा स्वारगेट ते चिंचवड या मेट्रो मार्गाचा प्रकल्प राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ‘पीआयबी’ व अर्थ समितीकडे अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव आहे. तसेच, वनाज ते रामवाडी या वादग्रस्त मार्गांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे निर्णयासाठी प्रलंबित आहे. मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्पेशल पर्पज व्हेईकलची (एसपीव्ही) स्थापना करण्यात आली आहे. तसेच, एससीएमटीआरची भूंसपादन प्रक्रिया महापालिकेकडून वेगाने सुरू आहे. त्यामुळे ऐनवेळी मेट्रो व एचसीएमटीआरचा समावेश पुणे महानगर प्राधिकरणात करण्यात येऊ नये, अशी भूमिका महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बैठकीत मांडली. त्यामुळे मेट्रोचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला. (प्रतिनिधी)

मेट्रोच्या अंमलबजावणीसाठी ‘एसपीव्ही’ या स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे ऐनवेळी कंपनीचे अधिकार पीएमआरडीएला देणे अडचणीचे व प्रकल्पासाठी दिरंगाईचे ठरणार आहे. मात्र, एसपीव्हीमध्ये पीएमआरडीएला प्रतिनिधित्व देण्यास आमची हरकत नाही.
-दत्तात्रय धनकवडे, महापौर.

Web Title: Metro- 'HCMTR' is not in PMRDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.