मेट्रोची सुनावणी सुरू
By admin | Published: October 17, 2014 11:11 PM2014-10-17T23:11:31+5:302014-10-17T23:11:31+5:30
1987 च्या विकास आराखडय़ात मेट्रोसाठी तयार करण्यात आलेल्या सुधारित तरतुदींसाठीच्या नियमावलीवर आलेल्या हरकती व सूचनांची सुनावणी गुरूवारपासून सुरू झाली
Next
पुणो : महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखडा आणि 1987 च्या विकास आराखडय़ात मेट्रोसाठी तयार करण्यात आलेल्या सुधारित तरतुदींसाठीच्या नियमावलीवर आलेल्या हरकती व सूचनांची सुनावणी गुरूवारपासून सुरू झाली असून गेल्या दोन दिवसांपासून सुमारे 4क्क् वैयक्तिक हरकतींची सुनावणी पूर्ण झाली आहे. या तरतुदींवर तब्बल 5 हजार 4क्क् हरकती आणि सूचना आल्या आहेत.
मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला आहे. मात्र, त्याला स्वयंसेवी संस्थांनी तीव्र विरोध केला आहे. तसेच नियमावलीतील ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’च्या मुद्द्यालाही तीव्र विरोध होत आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिकेने दिलेल्या मुदतीत आलेल्या हरकती व सूचनांमध्ये सुमारे 9क् टक्के नागरिकांनी मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूला चार एफएसआय देण्यास विरोध दर्शविला आहे, असे प्रशासनातील अधिकृत सूत्रंनी नमूद केले. तसेच अन्य सूचना व हरकतींमध्ये मेट्रोच नको, असे म्हणणाराही वर्ग मोठय़ा संख्येने असल्याचे सांगण्यात आले. सर्व हरकती व सूचनांची सुनावणी घेण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्या नुसार महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या आदेशानुसार, नगर अभियंता यांनी सुनावणीची प्रक्रिया सुरू केली आहे.