उरुळी कांचनपर्यंत पुण्याची मेट्रो न्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:53 AM2017-08-03T02:53:30+5:302017-08-03T02:53:30+5:30

पुणे-सोलापूर रोड परिसरात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतुकीचे योग्य नियोजन होण्यासाठी ‘स्वारगेट ते उरुळी कांचन’ मार्गावर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करावा, अशी मागणी नगरसेवक योगेश ससाणे यांनी केली आहे.

Metro navy from Pune to Uruli Kanchan | उरुळी कांचनपर्यंत पुण्याची मेट्रो न्यावी

उरुळी कांचनपर्यंत पुण्याची मेट्रो न्यावी

Next

हड़पसर : पुणे-सोलापूर रोड परिसरात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतुकीचे योग्य नियोजन होण्यासाठी ‘स्वारगेट ते उरुळी कांचन’ मार्गावर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करावा, अशी मागणी नगरसेवक योगेश ससाणे यांनी केली आहे.
पुणे शहराच्या पूर्व भागातून पुण्यात येणारा हडपसर हा एकमेव मार्ग आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत पुणे शहराचा विस्तार हा उरुळी कांचनपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात नोकरदार, कामगार, विद्यार्थी; तसेच व्यावसायिकांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते.
या भागासाठी एकच प्रमुख रस्ता असल्याने त्या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे, तर काही भागातील रस्ता अरुंद आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत मोठी भर पडते.

Web Title: Metro navy from Pune to Uruli Kanchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.