मेट्रोचा अहवाल पाच दिवसांत मुख्यमंत्र्यांना देणार

By admin | Published: April 14, 2015 01:39 AM2015-04-14T01:39:54+5:302015-04-14T01:39:54+5:30

वनाझ ते रामवाडी या वादग्रस्त मेट्रो मार्गाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या चार-पाच दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल,

Metro report to Chief Minister in five days | मेट्रोचा अहवाल पाच दिवसांत मुख्यमंत्र्यांना देणार

मेट्रोचा अहवाल पाच दिवसांत मुख्यमंत्र्यांना देणार

Next

पुणे : वनाझ ते रामवाडी या वादग्रस्त मेट्रो मार्गाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या चार-पाच दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ची पहिली बैठकही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे सांगितले.
विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी बापट यांनी पत्रकार परिषद आयोजिली होती. वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गाबाबत स्वयंसेवी संस्थांचे आक्षेप असल्यामुळे या मार्गाचा अभ्यास करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, दिल्ली मेट्रोचे जनक ई. श्रीधरन, दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनचे (डीएमआरसी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगो सिंह, उद्योगपती अभय फिरोदिया, अर्थतज्ज्ञ विजय केळकर, मेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये यांच्यासमवेत राव आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर यांचा या समितीमध्ये समावेश आहे. या समितीच्या यापूर्वी काही बैठका झाल्या असून महिन्याच्या आत समितीला त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे. या समितीची अंतिम बैठक सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. याबाबत बापट म्हणाले, ‘‘येत्या चार-पाच दिवसांत समितीचा अहवाल शासनाला सादर करणार आहे. परंतु अहवालाचा तपशील सांगण्यास बापट यांनी नकार दिला. मुख्यमंत्र्यांनी अहवालाला मान्यता दिल्यानंतर हा अहवाल पुन्हा केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल.

गेल्या सतरा ते अठरा वर्षांपासून रखडलेल्या पीएमआरडीएची स्थापनाही करण्यात आली आहे. सर्व शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींचा यामध्ये समावेश करण्यात आला असून अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी घटनेत बदल करावा लागणार आहे. पीएमआरडीएची समिती स्थापन करण्यात आल्यामुळे या समितीची पहिली बैठकही मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.

Web Title: Metro report to Chief Minister in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.