मेट्रोचे नदीपात्रातील खांब नियमानुसारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:12 AM2021-01-20T04:12:32+5:302021-01-20T04:12:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुठा नदीपात्रात असलेले पुणे मेट्रोचे सर्व काम नियमानुसारच असल्याचा दावा महामेट्रोच्या वतीने करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुठा नदीपात्रात असलेले पुणे मेट्रोचे सर्व काम नियमानुसारच असल्याचा दावा महामेट्रोच्या वतीने करण्यात आला. खासदार वंदना चव्हाण यांनी या खांबांमुळे पात्राची रुंदी कमी झाली असून, पुराचा धोका वाढला असल्याचा आरोप सोमवारी केला होता. महामेट्रो कंपनीने हा आरोप चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
नदीपात्रातील खांबांसाठी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या निर्देशानुसारच नदीपात्रातील मेट्रोचे सर्व काम झाले असल्याचे महामेट्रोचे म्हणणे आहे.
त्याशिवाय नदीपात्रात काम सुरू केले. त्याच वेळी महामेट्रो कंपनीने पात्रात खोदकाम करताना जैवविविधता नष्ट होऊ नये, यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ नियुक्त केले होते, तसेच पाटबंधारे विभागाकडून नदीपात्रातील पूररेषा, धरणातून किती वेगाने पाणी सोडल्यानंतर ते कुठपर्यंत येते, मागील अनेक वर्षांतील आकडेवारी अशी माहिती घेतली. त्यानंतर, तज्ज्ञ समितीने सांगितले, त्याप्रमाणेच पात्रातील सर्व बांधकाम केले आहे, असे महामेट्रोने म्हटले आहे.