मेट्रो मार्गांवरील रस्ते दुरुस्तीची बिले महामेट्रोला पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 10:16 PM2019-12-06T22:16:32+5:302019-12-06T22:19:06+5:30

महापालिकेच्या देयकातून रक्कम कपात करणार

Metro routes roads repaired bills will send to Mahametro | मेट्रो मार्गांवरील रस्ते दुरुस्तीची बिले महामेट्रोला पाठविणार

मेट्रो मार्गांवरील रस्ते दुरुस्तीची बिले महामेट्रोला पाठविणार

Next
ठळक मुद्देमहापालिकेला तब्बल ९५१ कोटी रुपये महामेट्रोला द्यावे लागणार

पुणे : शहरामध्ये सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामुळे बहुतेक प्रमुख रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, गेल्या चार-पाच महिन्यांत या रस्त्यावर पडलेले खड्डे व लहान-मोठी दुरुस्तीची कामे महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहेत. यामुळे यासाठी झालेला सर्व खर्चाची बिले महामेट्रोला पाठविण्यात येणार असून, ही रक्कम महापालिकेला मेट्रोला देण्यात येणाऱ्या देयकातून कपात करण्यात येणार असल्याचे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी सांगितले.
    महामेट्रोच्या वतीने शहरामध्ये सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामध्ये पुणे महापालिका देखील भागीदार आहे. यामध्ये शहरात पहिल्या टप्प्यात सुमारे ११ हजार ५०० कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेला तब्बल ९५१ कोटी रुपये महामेट्रोला द्यावे लागणार आहेत. महापालिका हा खर्च मेट्रोला जागेच्या मोबदल्यात देण्यात आहे. आता रस्ते दुरुस्तीचा खर्च देखील या देयकामधून कपात  येणार आहे.शहरामध्ये सध्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी असे दोन मार्गाचे काम सुरु आहे.परंतु सद्या शहरामध्ये मेट्रोच्या वतीने मेट्रो मार्ग आणि मेट्रो स्टेशनची कामे सुरु आहेत. यामुळे मोठा प्रमाणात आवजाड मशनरी आणि वाहनाची मेट्रो मार्गाचे काम सुरु असलेल्या रस्त्यावरून होत आहे.याचा परिणाम गेल्या चार-पाच महिन्यात पावसाळा आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. 
    मेट्रोचे काम सुरु असलेल्या रस्त्यांवर सातत्याने खड्डे पडत असल्याने शहरामध्ये होणारी वाहतुक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून वेळोवेळी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. याबाबत महामेट्रोला लेखी पत्र देऊन देखील दुर्लक्ष करण्यात येत होते. परंतु नागरिकांचा रोष टाळण्यासाठी ही कामे महापालिकेच्या वतीने करण्यात आली. तसेच काही रस्त्यांवर मेट्रोमुळे नादुरुस्त झालेली ड्रेनेजची कामे देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहेत. या सर्व कामांचा खर्च महापालिकेच्या वतीने आता महामेट्रोला पाठविण्यात येणार असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Metro routes roads repaired bills will send to Mahametro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.