दोन बोगद्यांमधून धावणार मेट्रो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 09:14 PM2018-06-15T21:14:32+5:302018-06-15T21:14:32+5:30

मेट्रो स्वतंत्र बोगद्यांमधून धावणार असली तरी भुयारातील स्थानकांमध्ये त्यांच्यातील अंतर कमी होऊन त्या एकत्र असतील व स्थानकाचा फलाट संपला की पुन्हा वेगळ्या होतील. 

Metro to run through two tunnels | दोन बोगद्यांमधून धावणार मेट्रो

दोन बोगद्यांमधून धावणार मेट्रो

Next
ठळक मुद्देप्रत्येकी ६ मीटरचा व्यास :  ५ किलोमीटर अंतरासाठी दोन निविदाभुयारातील स्थानकात उतरून वर रस्त्यावर येण्यासाठी किंवा आत उतरण्यासाठी म्हणून प्रवाशांना सरकत्या जिन्यांची व्यवस्था

पुणे : मेट्रो च्या भुयारी मार्गाच्या दोन निविदा प्रसिद्ध झाल्या असून तत्पुर्वी बोगद्यात मेट्रो जाण्यासाठी लागणाºया शाफ्टचे (उतार) काम सुरू करण्यात आले आहे. प्रत्येकी ६ मीटर व्यासाच्या दोन बोगद्यांमधून येणारी व जाणारी अशा दोन मेट्रो धावणार आहेत. 
मेट्रो च्या कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या ५ किलोमीटर अंतराच्या भूयारी मार्गाच्या कामाबाबत पुणेकरांमध्ये औत्सुक्य आहे. जमिनीच्या खाली १८ ते २८ मीटर खोलीवर मेट्रोचा ट्रॅक (रूळ असतील) भुयारीतील मेट्रो जमीनीवरूनच धावणार आहे. प्रत्येकी ६ मीटर व्यासाचा असे दोन बोगदे असतील. जमिनीखाली किमान ३० मीटर अंतरावर ते असणार आहे. जाणारी व येणारी मेट्रो स्वतंत्र बोगद्यांमधून धावणार असली तरी भुयारातील स्थानकांमध्ये त्यांच्यातील अंतर कमी होऊन त्या एकत्र असतील व स्थानकाचा फलाट संपला की पुन्हा वेगळ्या होतील. 
प्रकल्प व्यवस्थापक अभियंता गौतम बिऱ्हाडे यांनी ही माहिती दिली. शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई व स्वारगेट अशी ५ भुयारी स्थानके या मार्गावर असतील. ती रस्त्याच्या वर कुठे खुली होतील (प्रवासी रस्त्यावर येण्याची जागा) ती ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. तिथे साधारण १० मीटर जागा मेट्रोला लागणार आहे. संबधित जागामालकांशी संपर्क साधण्यात आला असून त्यांच्या नुकसानभरपाईची बोलणी सुरू आहेत. भुयारातील स्थानकात उतरून वर रस्त्यावर येण्यासाठी, किंवा आत उतरण्यासाठी म्हणून प्रवाशांना सरकत्या जिन्यांची व्यवस्था असणार आहे.
शहराच्या बरोबर मध्यभागातून हा भूयारी मार्ग जाणार असल्यामुळे त्याच्या खोदकामाचा रस्त्यावरच्या आसपासच्या इमारतींना धोका नाही का असे विचारले असता बिºहाडे यांनी सांगितले अत्यंत आधुनिक पद्धतीने हे खोदकाम होणार आहे. खोदताना निर्माण होणारी कंपने दुरवर पोहचणार नाहीत याची तांत्रिक व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे हादरे बसत नाही. आवाज होत नाही. बोगदा जेवढ्या आकाराचा तेवढेच कटर असते. ते शाफ्टमधून आत गेले की थेट काम संपते तिथेच वर काढण्यात येते. त्यामुळे कोणत्याही बांधकामांना कसलाही धोका निर्माण होणार नाही.
 पुण्यात ५ किलोमीटरच्या भुयारी मार्गाचे कृषी महाविद्यालय ते बुधवार पेठ व बुधवार पेठ ते स्वारगेट असे दोन भाग करण्यात आले आहेत. या दोन्ही भागांच्या स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मुंबई, दिल्ली व अन्य जिथे मेट्रो बोगद्यातून जाते तिथे याच पद्धतीने बोगद्यांचे खोदकाम करण्यात आले. त्याचा काहीही त्रास वरच्या जुन्या किंवा नव्या बांधकामांना झालेला नाही. तसेच निकष या कामाच्या निविदेतच स्पष्ट करण्यात आले असून ते पाळणे ठेकेदार कंपनीवर बंधनकारक असणार आहेत अशी माहिती बिºहाडे यांनी दिली. या कामाचा नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच काम केले जाणार आहे असे ते म्हणाले. 
कर्वेरस्त्याच्या कामाला आता गती मिळाली आहे. नदीपात्रातील ५९ खांबांपैकी ३२ खाबांचे फौंडेशन पुर्ण झाले आहे. ३३ खांब पाईल पद्धतीने म्हणजे जमीनीत खोलवर छिद्र घेऊन त्यावर फौंडेशन व नंतर खांबाची उभारणी या पद्धतीने करण्यात येत आहे. पाऊस सुरू होण्यापुर्वी जास्तीतजास्त काम व्हावे असा प्रयत्न करण्यात येत आहे असे बिऱ्हाडे यांनी सांगितले. 

Web Title: Metro to run through two tunnels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.