मेट्रो जास्त लाभ, कमी त्रास देणारी असावी

By admin | Published: October 15, 2015 01:08 AM2015-10-15T01:08:46+5:302015-10-15T01:08:46+5:30

‘‘फसलेली बीआरटी तसेच चुकलेले उड्डाणपूल डोळ्यांसमोर असताना पु्ण्यातील नियोजित मेट्रो निर्दोष असावी, अशी इच्छा बाळगणे गैर नाही; मात्र टीका करणाऱ्यांना ते समजणार नाही

The metro should be more profitable, less troublesome | मेट्रो जास्त लाभ, कमी त्रास देणारी असावी

मेट्रो जास्त लाभ, कमी त्रास देणारी असावी

Next

पुणे : ‘‘फसलेली बीआरटी तसेच चुकलेले उड्डाणपूल डोळ्यांसमोर असताना पु्ण्यातील नियोजित मेट्रो निर्दोष असावी, अशी इच्छा बाळगणे गैर नाही; मात्र टीका करणाऱ्यांना ते समजणार नाही, पत्र पाठवून त्यांना ते समजावून देऊ,’’ अशा शब्दांत खासदार अनिल शिरोळे यांनी माजी पालकमंत्री अजित पवारांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
पिंपरी येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना एका खासदारांमुळे पुण्यातील मेट्रो रखडली व खर्चात फार मोठी वाढ झाली, अशी टीका पवार यांनी खासदार शिरोळे यांचे नाव न घेता केली. त्याला शिरोळे यांनी आज उत्तर दिले. पुण्यातील ही नियोजित मेट्रो जास्तीत जास्त लाभदायक व कमीत कमी त्रासदायक असावी, अशीच लोकप्रतिनिधी म्हणून आपली इच्छा आहे. ती भुयारी असावी की रस्त्याच्यावरून असावी, हा मुद्दा यात नाही. कमी गर्दीच्या रस्त्यावर ती वरून असावी व गर्दीच्या रस्त्यावरून भुयारी, हा विचार यामागे आहे व तो गैर नाही, असे शिरोळे यांनी म्हटले आहे.

Web Title: The metro should be more profitable, less troublesome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.