संत तुकारामनगर स्थानकात मेट्रोचा पहिला सरकता जिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:15 AM2021-08-14T04:15:57+5:302021-08-14T04:15:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘मेट्रो’च्या संत तुकारामनगर स्थानकात (पिंपरी-चिंचवड) पहिला सरकता जिना (एक्सलेटर) बसवण्यात आला. केंद्र सरकारच्या ‘मेक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘मेट्रो’च्या संत तुकारामनगर स्थानकात (पिंपरी-चिंचवड) पहिला सरकता जिना (एक्सलेटर) बसवण्यात आला. केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत चाकण येथील कारखान्यात हा जिना तयार करण्यात आला आहे.
या धोरणांतर्गत केंद्र सरकारने सर्व सरकारी, निमसरकारी उपक्रमांत लागणारी यंत्रे भारतात तयार केलेली असावीत, असे बंधन घातले आहे. महामेट्रो कंपनी त्याचे पालन करत असून त्यामुळेच मेट्रो स्थानकात हा जिना बसवण्यात आला, असे ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
पुणे ‘मेट्रो’च्या दोन्ही मार्गांवरील ३० स्थानकांत १६६ एक्सलेटर बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना स्थानकामध्ये जलदपणे ये-जा करता येणार आहे. या एक्सलेटरमध्ये अत्याधुनिक अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत एक्सलेटर थांबविण्यासाठी ३ ठिकाणी इमर्जन्सी स्टॉप बटन आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार त्याचा वेग कमी-जास्त करता येणार आहे.