मेट्रोच्या सिक्युरिटी सुपरवायझरला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: December 25, 2023 17:39 IST2023-12-25T17:38:57+5:302023-12-25T17:39:47+5:30
याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे....

मेट्रोच्या सिक्युरिटी सुपरवायझरला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : जुन्या रागातून मेट्रोच्या सिक्युरिटी सुपरवायझरला धक्काबुक्की करण्याबराेबरच कंपनीच्या चारचाकी गाडीची तोडफोड केल्याची घटना शनिवारी (दि. २३) घडली. हा प्रकार ताडीगुत्ता नदीपात्रात रात्री साडेअकरा ते पावणे बाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जयंत बबन पिसाळ (५१, रा. कवडे वस्ती, वाघोली) यांनी रविवारी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गोल्ड्या उर्फ सचिन गवळी (३०) आणि मंगेश (२५, पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी जयंत पिसाळ हे ताडीगुत्ता नदीपात्रात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावर सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. आरोपींनी जुन्या रागातून पिसाळ काम करत असलेल्या जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. या कंपनीच्या कामगारांना धक्काबुक्की केली. तसेच कंपनीच्या गाडीची तोडफोड करून नुकसान केले. तसेच पिसाळ यांना लाकडी फावड्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड करत आहेत.